ताज्या घडामोडी

जिल्हापरिषदेच्या वतीने दोंदे गावाला आदर्श कृषीग्राम पुरस्कार

Spread the love

कडूस : खेड तालुक्यातील दोंदे गावाने कृषी क्षेत्रात केलेल्या भरीव व उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत जिल्हा परिषदेच्या वतीने गावाला आदर्श कृषीग्राम पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

खेड पंचायत समितीच्या सभागृहात आमदार मोहिते यांच्या हस्ते ग्रामस्थांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अत्यंत साध्या पद्धतीने हा समारंभ पार पडला.

यावेळी सरपंच चंद्रकांत बारणे, उपसरपंच सिद्धार्थ कोहिनकर, जिल्हा परिषद सदस्य अरुण चांभारे, गटविकास अधिकारी अजय जोशी, सहाय्यक गटविकास अधिकारी बाळासाहेब ढवळे, माजी सरपंच स्वाती कोहिनकर, कृषी विस्तार अधिकारी बाळासाहेब ओव्हाळ, ग्रामसेवक निलेश पांडे, ग्रामपंचायत सदस्य हनुमंत कदम ,नंदा जाधव, वैशाली सुकाळे, सुनिता बनकर ,सुरेखा बारणे ,कल्पना केदारी, किसन बनकर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!