डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालय फॉरेस्ट बुद्ध नगर यांचे तर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार दिन साजरा…….!

सोलापूर:- वाडिया हॉस्पिटल येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालय फॉरेस्ट बुद्ध नगर यांचे तर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सुरवातीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन प्राध्यापक शंकर खळसोडे यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी बोलताना विश्वास नागटिळक म्हणाले की, विद्यापीठ नामांतर चळवळीत अनेकांनी बलिदान दिले असून त्यांना या प्रसंगी आदरांजली वाहण्यात आली. या प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते भानुदास रणशृंगारे,चंद्रकांत गायकवाड, सतीश आवारे,रमेश शिखरे,सुनील आवारे,संजय साळवे,संजय गायकवाड,मधुकर जाधव,उत्तम सरवदे सर, इंगळे सर बाबुराव सरवदे सर आदि मान्यवर व्यक्ती या प्रसंगी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन चंद्रमणी शिवशरण,राहुल रणशृंगारे, सुमेध न्यायनिरगुडे,यांनी केले होते. शेवटी चंद्रमणी शिवशरण यांनी उपस्थितांचे आभार मानले. यावेळी तमाम भीमसैनिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.



