महाराष्ट्र दिन 1 मे 2023 रोजी सकाळी 8 वाजता बार्शी नगरपरिषद, बार्शी समोर धरणे आंदोलन……!
युवक काँग्रेसच्या धरणे आंदोलनाला यश

बार्शी:- महाराष्ट्र दिन 1 मे 2023 रोजी सकाळी 8 वाजता बार्शी नगरपरिषद, बार्शी समोर धरणे आंदोलन करण्यात आले, सोलापूर रोडवरील चर्च ते 8 नंबर शाळे मागील उर्वरित राहिलेली ड्रेनेजचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे, व सोलापूर रोड येथील घोडके दुकान ते नगरपालिका 8 नंबर शाळे मागील गटार नविन करण्यात यावी, जुनी गटार पूर्णपणे खराब झाली आहे तरी नगरपालिकेला यापूर्वी निवेदन व स्मरणपत्र दिले होते तरी देखील मागण्या पूर्ण झाल्या नसल्या कारणाने युवक काँग्रेसच्या वतीने महाराष्ट्र दिन रोजी धरणे आंदोलन बार्शी नगरपरिषद समोर करण्यात आले.
यात मोठ्या संख्येने सोलापूर रोड भागातील नागरीक आंदोलनात सहभागी होते व काँग्रेसचे ज्येष्ठ नेतेही सहभागी झाले होते नगरपालिकेने आंदोलनाची दखल घेत मागण्या आठ दिवसात पूर्ण करू अशी लेखी निवेदन देऊन धरणे आंदोलन मागे घेण्यासाठी विनंती केली यावेळी युवक काँग्रेसचे बार्शी उपाध्यक्ष राकेश नवगिरे यांनी आठ दिवसात काम पूर्ण झाले नाही तर यापेक्षाही तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिला यावेळी प्रकाश दाखले, रमजान भाई पठाण, प्रवीण भादिकर, संजय अंधारे, भवानीदास भादिकर विकास नवगिरे, अनुप रणदिवे, अजय नवगिरे, राजा सय्यद, मोसिन शेख आदी उपस्थित होते..



