*राजकिय भुकंपामुळे पक्षांची विश्वासार्हता राहिली नाही. त्यामुळे मतदारात मतदानाचा उत्साह नाही*

नांदेड- (राजकीय वास्तव- सखाराम कुलकर्णी ८२७५३३३५०८ )होत असलेल्या लोकसभा निवडणुकीत जास्तीत जास्त मतदान व्हावे या साठी प्रशासन वेगवेगळ्या मार्गाने मतदारात मतदानाची जनजागृती करत आहे. पण होत असलेल्या पक्षांतरच्या राजकिय भुकंपामुळे राजकीय विश्वासार्हता गेली. म्हणुन मतदारांचा मतदानाचा उत्साह कमी झाल्याचे दिसत आहे.
लोकसभेच्या निवडणुकीच्या मतदानाचा पहिला टप्पा पार पडला असून दि.२६ एप्रिल रोजी दुसर्या टप्प्यासाठी मतदान होत आहे. पाहिल्या टप्प्यातील मतदानाची टक्केवारी कमी होती. व मतदानाची टक्केवारी वाहण्यासाठी प्रशासन प्रयत्न करत आहे. मतदानाची टक्केवारी दर वेळेस कमी कमी होत चालली. म्हणुन मतदारांत जनजागृती करण्यासाठी प्रशासनावर वेळ आली.प्रशासन सर्व विभागाकडून दिंड्या काढून सर्वांनी मतदान करण्याचे आवाहन करत आहे. खुद्द पंतप्रधानांना ही सभेतून मतदान करण्याचे आवाहन करावे लागत आहे. कोणालाही करा पण मतदान करा. हे सांगायची वेळ आली. तरी अजूनही मतदारात उत्साह आलेला दिसत नाही. कोणता नेता कोणत्या पक्षात जाईल व केव्हा जाईल हे सांगता येत नाही.इतकी वर्षे भारतीय जनता पक्ष धुतल्या तांदळा सारखा स्वच्छ होता. पण आता या पक्षात घोटाळे, गैर कारभार केलेल्या नेत्यांचीच संख्या वाढली. तर भाजप जनतेच्या हिताचे काय निर्णय घेईल असे मतदारांत बोलल्या जात आहे.चांगले शासन करेल असे कोणत्या पक्षाचे सरकार असेल असा प्रश्न आज जनते सोबत आहे. एका पक्षाचे दोन- दोन पक्ष झालेत. भाजपा सरकारच्या पण बर्याच घोषणा ह्या घोषणाच राहिल्या. बरेच शेतकरी कर्ज मुक्ती पासून वंचित राहिले .मुख्यमंत्री सन्मान निधी ६००० रुपये अद्याप मिळाला नाही. राजकीय पक्षांच्या भुकंपामुळे व सरकारच्या घोषणेमुळे मतदार विचलित झाला. व कोणते सरकार जनतेच्या हिताचे राहील या विचारात मतदार गुरफटून गेला. शेवटी पक्षा पेक्षा व्यक्ति पाहून मतदान होईल असे दिसते.



