ताज्या घडामोडी

संतोष भेगडे फाउंडेशनचा स्तुत्य उपक्रम; गणेशमूर्तींचे संकलन व विधीवत विसर्जन करणार

Spread the love

तळेगाव : नगरसेवक संतोष भेगडे यांच्या फाउंडेशनच्या वतीने तळेगाव शहरात स्तुत्य उपक्रम राबवण्यात येणार आहे. गुरुवार (दि. 16 सप्टेंबर) रोजी शहरातील विविध भागातून गणेशमूर्ती व निर्माल्य संकलन करून भक्तीभावाने विधिवत विसर्जन करण्यात येणार आहे.

शहरातील सात विभागांमधून दुपारी 12 ते 4 या वेळेत फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून सोसायटी किंवा घराजवळून गणेशमूर्तींचे संकलन करण्यात येणार आहे.10 ट्रॅक्टर, 12 टेम्पो,3 पिकप अशा एकूण 25 गाड्यांमध्ये गणेशमूर्ती संकलन करण्यात येईल.

प्रशासनाने नदीपात्रात व तलावांमध्ये गणेशमूर्ती विसर्जन करण्यासाठी बंदी केल्याने हा उपक्रम राबविला जात आहे. सर्व गणेशभक्तांनी आपल्या घरातील गणेशमूर्ती विसर्जनासाठी संपर्क करावा असे आवाहन फाउंडेशनच्यावतीने नगरसेवक संतोष भेगडे यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!