ताज्या घडामोडी

मोटार वाहन कायद्यातील नव्या सुधारणांमुळे दंडाच्या रकमेत वाढ

Spread the love

पुणे : मोटार वाहन कायद्यात केलेल्या नव्या सुधारणांमुळे दंडाच्या रकमेत मोठी वाढ झाली आहे.मात्र यापूर्वी दंड झालेल्या रकमा भरलेल्या नसतील तर त्या रकमा नवीन सुधारित नुसार भराव्या लागणार आहेत. वाहनचालकांना याचा मोठा भुर्दंड बसणार आहे.

नवीन दंडाची रक्कमही जुन्या रकमेच्या तुलनेत दहापट अधिक आहे. वाहनावरील दंड भरला जातो तेव्हा अस्तित्वात असेल ती दंडाची रक्कम ग्राह्य धरतात त्यामुळे वाहनचालकांना सध्या तरी मोठा फटका बसणार आहे.

जुने दंड ग्राह्य धरले जावे असा तूर्तास तरी सरकारने आदेश दिलेला नाही त्यामुळे नवीन दंड आकारला जाईल असे पुणे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय ससाणे यांनी सांगितले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button
Don`t copy text!