ताज्या घडामोडी

श्रीराम मंदिरात श्री रामदास नवमी सूर्यनमस्कार उपक्रमाने साजरी

Spread the love

लोणावळा : जय जय रघुवीर समर्थ , असा नामघोष ऐकताच ज्यांची आठवण येते . गणपती बाप्पा ची आरती , तसेच दासबोध हा ग्रंथ लिहणारे व आजन्म ब्रम्हचारी राहणारे , लग्नाच्या बोहल्यावरून पळून जावून संसाराचा त्याग करणारे व महाराष्ट्रात गावोगावी हनुमान मुर्तींची स्थापना करणारे अशी कार्य करणारे समर्थ रामदास स्वामी यांची जयंती भांगरवाडी येथील श्रीराम मंदिरात साजरी करण्यात आली.

आज पहाटे साडेपाच ते साडेसहा वाजता सूर्यनमस्कार उपक्रमाचे सांगता कार्यक्रमाने साजरी करण्यात आली. यावेळी सुमारे पंचवीस साधक , विद्यार्थी यांनी ञिपुरारी पोर्णिमा ते श्री रामदास नवमी असा सूर्यनमस्कार करण्याचा शंभर दिवस बलोपासना उपक्रमाची आज सांगता प्रसाद वाटपाना झाली.कार्यक्रमाचे संयोजन पुजारी किरीट जोशी यांनी केले.शालेय विद्यार्थी कु.शौर्य पुट्टोल याने सूर्यनमस्कार करण्याचा यावेळी संकल्प केला.यावेळी आनेक मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button
Don`t copy text!