ताज्या घडामोडी

टाकवे बुद्रुक विविध कार्यकारी सोसायटीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अंकुश आंबेकर व जितेंद्र परदेशी यांची बिनविरोध निवड.

Spread the love

टाकवे बुद्रुक: विविध कार्यकारी सोसायटीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अंकुश आंबेकर व जितेंद्र परदेशी बिनविरोध
टाकवे बुद्रुक विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या निवडणुकीत 11 जागांसाठी 27 उमेदवार रिंगणात आहेत. त्यात 19 सर्वसाधारण कर्जदार, 6 महिला प्रतिनिधी आणि 2 इतर मागास वर्गाच्या उमेदवारांचा समावेश आहे. 13 जागांमध्ये सर्वसाधारण कर्जदार 8 जागा, महिला प्रतिनिधी 2 जागा, इतर मागासवर्ग 1 जागा, एस टी 1 जागा, एन टी 1 जागा असे आरक्षण आहे.तालुक्यातील टाकवे बुद्रुक विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या निवडणुकीची चुरस सध्या सुरू आहे. सोसायटीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अंकुश रामचंद्र आंबेकर व जितेंद्र काशिनाथ परदेशी यांची बिनविरोध निवड झाली आहे. उर्वरित 11 जागांसाठी 27 उमेदवार रिंगणात आहेत.

मावळ तालुक्यातील टाकवे बुद्रुक विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. 13 जागांची ही निवडणूक असून निवडणूक लढविण्यासाठी 52 इच्छुकांनी नामनिर्देशन केले. त्यातील 11 जणांचे नामनिर्देशन नामंजूर करण्यात आले.

मंगळवारी (दि. 24 मे) या निवडणुकीतून अर्ज माघारी घेण्याचा दिवस होता. त्यात 14 इच्छुक उमेदवारांनी अर्ज माघारी घेतले. दरम्यान सोसायटीत एक जागा अनुसूचित जाती, जमाती (एस सी) आणि एक जागा भटक्या जमाती, विमुक्त जाती/जमाती/विशेष मागास प्रवर्गासाठी ( इन टी) राखीव आहेत. या प्रवर्गातून अंकुश आंबेकर व जितेंद्र परदेशी यांचेच अर्ज राहिल्याने त्यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली असून उर्वरित 11 जागासांठीची निवडणूक 3 जून रोजी होत आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून राकेश निखारे यांनी काम पाहिले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button
Don`t copy text!