ताज्या घडामोडी

सुभाष घुले यांना बेस्ट परफॉर्मन्स इन ॲग्रीकल्चर मार्केटिंग ॲवॉर्ड

Spread the love

मुंबई : येथील वाय. बी.सेंटर मध्ये 28 व 29 ऑक्टोबर रोजी दैनिक नवभारत वृत्तपत्र समूह प्रस्तुत दैनिक नवराष्ट्रच्या वतीने घेण्यात आलेल्या परिषदेत सहकार क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल सुभाष घुले यांना ‘बेस्ट परफॉर्मन्स इन ॲग्रीकल्चर मार्केटिंग’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

सुभाष घुले यांना हा पुरस्कार महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते यावेळी झालेल्या दिमाखदार सोहळ्यात प्रदान करण्यात आला.

घुले हे महाराष्ट्र राज्य कृषि पणन विभागात उपसरव्यवस्थापक या पदावर कार्यरत आहेत. पणन मंडळाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी असणाऱ्या विविध योजना त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी विविध उपक्रम त्यांनी राबविले आहेत. या क्षेत्रातील उल्लेखनीय व आदर्शवत कामाची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार देण्यात आला.

“माझ्यासारख्या सामान्य अधिका-याला कामाची दखल घेऊन पुरस्कार दिल्याबद्दल आभार. यामुळे भविष्यामध्ये इतर अधिकाऱ्यांनाही प्रेरणा मिळेल. कामात योगदान दिल्यास आपण केलेल्या कामाची दखल घेतली जाते असे प्रत्येकाला वाटेल “अशी प्रतिक्रिया सुभाष घुले यांनी आवाज न्यूजशी बोलताना दिली.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button
Don`t copy text!