ताज्या घडामोडी
नाणे मावळ मधील रस्त्यांची त्वरित डागडुजी करा – राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसची मागणी
मावळ : तालुक्यातील नाणे मावळ मधील रस्त्यांची त्वरित डागडुजी करा. रस्त्यांना पडलेले खड्डे बुजवा अशी मागणी मावळ तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसने सार्वजनिक बांधकाम उपविभाग वडगाव मावळ उपअभियंता व्ही.एस.भुजबळ व ए. एस अडसुळे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
यावेळी मावळ तालुका राष्ट्रवादी युवक अध्यक्ष, संस्थापक युवा पर्व फाउंडेशन कैलास गायकवाड, जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेस सरचिटणीस विठ्ठल जाधव,मा. सरपंच कैलास खांडभोर ,सरपंच बाळासाहेब खंडागळे उपस्थित होते.



