सिंहगड टेक्निकल एज्युकेशन सोयसायटीच्या वतीने कुरवंडे येथे गरजूंसाठी फेस -मास्कचे वितरण
लोणावळा : सिंहगड टेक्निकल एज्युकेशन सोयसायटीच्या निवृत्ती बाबाजी नवले वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय कुसगाव, लोणावळा यांच्या वतीने व श्रीमती काशीबाई नवले वैद्यकीय महाविद्यालय नऱ्हे,पुणे च्या कम्युनिटी मेडिसिन व ग्रामीण आरोग्य प्रशिक्षण केंद्र लोणावळा यांच्या सहकार्याने गरीब व गरजूंसाठी फेस -मास्क वितरण आणि आरोग्य तपासणी सोहळा मान्यवरांचे हस्ते संपन्न झाला.
या उपक्रमाअंतर्गत कुरवंडे परिसरातील गरजू, गरीब, कष्टकरी व कामगार यांचेसाठी द्विस्तरीय फेस मास्क वाटपाचा आणि आरोग्य तपासणीचा कार्यक्रम दिनांक ५ जुलै २०२१ या दिवशी कुरवंडे ग्रामपंचायत कार्यालयात पार पडला. या कार्यक्रमावेळी कुरवंडे ग्रामपंचायत सरपंच अनिता दिलीप कडू आणि उपसरपंच रोहित किशोर गायकवाड, ग्रामपंचायतीचे सदस्य सचिन मारुती कडू , सदस्या राजश्री विशाल कडू , सुप्रिया हरिष पडवळ, रोहिणी सुमिर केदारी , ग्रामसेविका उज्वला कुंडलिक डावरे, ,ग्रा.प. कर्मचारी वृंद राजेंद्र सखाराम कडू, रोहित अशोक ससाणे, जगदीश भरत कदम उपस्थित होते .
एकूण ४०० मास्क ग्रामपंचायतीकडे सुपूर्त करण्यात आले. तसेच उपस्थित लोकांची आरोग्य तपासणी (ऑक्सिजन पातळी आणि शरीराचे तापमाण ) करण्यात आली .सद्यस्थितीत चालू असलेल्या कोरोना आपत्तीच्या कालावधीमध्ये समाजहिताची भावना समोर ठेऊन महाविद्यालयातील उन्नत भारत अभियानाअंतर्गत फेस -मास्कचे वितरण हा एक नाविन्यपूर्ण उपक्रम महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि विध्यार्थी विकास मंडळ यांच्या पुढाकाराने आणि श्रीमती काशीबाई नवले वैद्यकीय महाविद्यालय नऱ्हे,पुणे यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आला .
या उपक्रमाची अंमलबजावणी ही उन्नत भारत अभियानाअंतर्गत दत्तक घेतलेल्या गावांमध्ये करण्यात येत आहे. कुरवंडे हे त्यापैकीच एक. सिंहगड संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रो. एम. एन. नवले, संस्थापक सचिव डॉ . सुनंदा नवले यांच्या समाजोपयोगी कार्याच्या प्रेरणेतून सदर उपक्रमाची निर्मिती करण्यात आली असून या उपक्रमास लोणावळा संकुलाचे संचालक डॉ. एम. एस. गायकवाड तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयवंत देसाई, शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ . शिवाजी देसाई यांचे मार्गदर्शन लाभले आहे.
आजच्या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. सतिश सोनवणे (समन्वयक उन्नत भारत अभियान) प्रा. सारिका पाणवळ (कार्यक्रम अधिकारी -रासेयो ) सुनिल माळी व कुंवर सिंग (समन्वयक-रासेयो ), डॉ. ओमिषा वर्मा , डॉ. जय भानुशाली तसेच दत्ता जाधव यांचे सहकार्य लाभले. सूञसंचालन शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ . शिवाजी देसाई यांनी केले. आभारप्रदर्शन माजी सरपंच दिलीप कडू यांनी केले.




