*कर्तव्यदक्ष सि.ओ . मॅडम च्या भाडेतत्त्वावरील गाडीची नंबर प्लेट पिवळ्या ऐवजी पांढऱ्या रंगाची लाऊन नियमाची पायमल्ली*

नांदेड- भारतीय प्रशासन सेवेतील (आय.ए.एस.) अधिकाऱ्यांची शान भारी. राज्यातील काही आय.ए.एस. अधिकार्यांकडून शासनाने दिलेले वाहन बाजूला टाकून आलिशान वाहन नियमबाह्य प्रकारे व मनमानी भाडेतत्त्वावर घेऊन शासनाच्या तिजोरीला भगदाड पाडल्या जाते. तर जिल्हा परिषद नांदेडच्या शिस्तपालन म्हणुन ओळख झालेल्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी आपल्या भाडेतत्त्वावरील गाडीची परमीट ची नोंदी नुसार पिवळ्या रंगाची नंबर प्लेट ऐवजी पांढरा रंग चि नंबर प्लेट लाऊन परिवहनाच्या नियमाची पायमल्ली केली.याची तक्रार जेष्ठ पत्रकार सखाराम कुलकर्णी यांनी मुख्य प्रधान सचिवा कडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

भारतीय प्रशासन सेवेतील म्हणजे आय.ए.एस. दर्जाचे उच्च पदाचे अधिकारी जिल्ह्यात प्रामुख्याने दोन असतात .त्यात जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी. यांचे साठी शासनाने शासन निर्णय क्रमांक वाहन-2017/प्र. क्र. 41/17/विनियम नुसार 9 लाख पर्यंतची गाडी विकत घेऊन वापरण्यासाठीचे परिपत्रक (जी.आर.)आहे. पण या किमतीत फक्त 5 आसनी असलेली गाडी येते. पण या अधिकार्यांना हवी आलिशान 25 लाख किमतीची इनोव्हा, टोयाटो 7आसनी गाडी .तर असी गाडी शासनाकडून घेता येत नसल्यामुळे काही आय.ए.एस अधिकारी निविदा न मागवता गुपचूप भाडेतत्त्वावर पाहिजे ती गाडी भाडेतत्त्वावर घेतात. भाडेतत्त्वावर घेताना सर्व नियम लाल फितीत बांधुन, नियमबाह्य, निविदा जाहिरात न देता, निविदा न मागवता मनमानी भाडे दरावर भाडेतत्त्वावर घेतात. तर काही अधिकारी आपल्या उच्च पदाचा दुरुपयोग करून इतरही नियमांचा भंग करतात. जिल्हा परिषद नांदेड मध्ये भाडेतत्त्वावर घेतलेल्या बर्याच वाहनात नियम भंग करून शासनाची फसवणूक केल्याचे दिसून आले. नांदेडच्या सि.ओ मिनल करनवाल यांनी पदभार स्वीकारला की मागील सि.ओ वर्षा ठाकूर, घुगे यांनी भाडेतत्त्वावरच घेतलेले MH26BE2050 हे वाहन बाजूला टाकून योगिराज टूर्स अँड ट्रॅव्हल चि MH 26 CH 7209 नवी गाडी भाडेतत्त्वावर घेतली. या सि.ओ मॅडम शिस्तपालन, कर्तव्यदक्ष असल्याची प्रसिद्धी झाली. तर यांनी पण शासकीय गाडी असताना भाडेतत्त्वावर आलिशान गाडी घेतली. ही गाडी परमिट असल्याची नोंद प्रादेशिक परिवहन कार्यालयात आहे. त्या नुसार या गाडीची नंबर प्लेट पिवळ्या रंगाची असावी. पण कर्तव्यदक्ष मॅडम च्या गाडीची नंबर प्लेट पांढऱ्या रंगाची लाऊन परिवहनाचा नियम भंग केला. मागील सि.ओ वर्षा ठाकूर घुगे यांची भाडेतत्त्वावर घेतलेली गुरुनानक टूर्स अँड ट्रॅव्हल ची MH26BE 2050 ही गाडी तर विमा संपलेला असतानाही शासकीय कामासाठी, मंत्र्यांच्या ताफ्यात चालत होती. व अजून ही विमा नसताना शासकीय सेवेत आहे. तर काही गाड्यांचे पियुषी संपलेले आहे. नंबर प्लेट रंग बदलणे, विमा संपलेले, पियुषी संपलेले, फिटनेस नसलेले वाहन चालवणे गंभीर गुन्हा असून दंडात्मक कारवाईचा आहे. खाजगी वाहनावर लाल अक्षरात महाराष्ट्र शासन लिहू नये असाही नियम आहे. या नियमाची पण पायमल्ली होते. वाहनांमुळे सर्व सामान्य जनतेने कडून आरटीओ अधिकार्यांनी दंड वसूल केलेत. पण उच्च पदावर असलेल्या अधिकाऱ्यांच्या गाड्या तपासणे व काही गैर असेल तर दंड वसूल करण्याची हिम्मत आरटीओ अधिकारी करत नाहीत. ही गंभीर बाब आहे. या गैर प्रकाराची तक्रार जेष्ठ पत्रकार तथा माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समितीचे म . राज्य कार्याध्यक्ष सखाराम कुलकर्णी यांनी मुख्य प्रधान सचिव, उपसचिव वित्त विभाग, परिवहन आयुक्त, विभागीय आयुक्त यांचे कडे केली.हे अधिकारी भाडेतत्त्वावर घेतलेले वाहन दीड-दोन वर्ष वापरून सोडून देतात व पुन्हा दुसरे वाहन भाडेतत्त्वावर घेतात. या पाहिल्या वाहनांवर महाराष्ट्र शासन लिहलेले असते ते गाडी सोडवताना मोडल्या जात नाही. त्यामुळे खाजगी वाहन मालक त्याचा गैरवापर करतो.असे ही बरेच गैरप्रकार झाल्याचे कुलकर्णी यांनी या निवेदनाद्वारे शासनाच्या निदर्शनास आणून दिले.



