राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा सप्ताहामध्ये ७९६ लाभार्थीनी घेतला लाभ …
सुमारे ७९६ लाभार्थी यांनी आधारकार्ड नवीन नोंदणी , मतदारनोंदणी , उत्पन्न दाखले , संजय गांधी निराधार योजना आदींचा लाभ घेतल्याचे लोणावळा मंडलअधिकारी बी.के.मेकाले यांचेकडून सांगण्यात आले.
राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा सप्ताहामधे ७९६ लाभार्थी यांनी घेतला लाभ …
आवाज न्यूज: मच्छिंद्र मांडेकर लोणावळा.२९ सप्टेंबर..

लोणावळ्यात सेवा पंधरवड्यास चांगला प्रतिसाद ..! !
लोणावळा ता.२७(प्रतिनिधी ) राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा सप्ताहाचे लोणावळ्यात ता.२८ आॕक्टोबर रोजी आयोजन करण्यात आले होते. यावेळी सुमारे ७९६ लाभार्थी यांनी आधारकार्ड नवीन नोंदणी , मतदारनोंदणी , उत्पन्न दाखले , संजय गांधी निराधार योजना आदींचा लाभ घेतल्याचे लोणावळा मंडलअधिकारी बी.के.मेकाले यांचेकडून सांगण्यात आले.

देशाचे पंतप्रधान नरेँद्रजी मोदी यांचे वाढदिवसाचे दिवसापासून ता.२आॕक्टोबर राष्ट्रपिता महात्माजी गांधी यांच्या जयंतीनिमित्त हा सेवा पंधरवडा निमित्ताने महसूल विभागाच्यावतीने भारतरत्न डाॕ.बाबासाहेब आंबेडकर प्राथमिक विद्यालयात , लोणावळा येथे सकाळी १० ते सायंकाळी ५ पर्यत आयोजित करण्यात आला होता.
मावळचे उपविभागीय अधिकारी ताथा प्रांताधिकारी संदेश शिर्के , मावळचे तहसिलदार तथा दंडाधिकारी मधुसुदन बर्गे , महसूल नायब तहसिलदार प्रसन्न केदारी यांचे मार्गदर्शनाखाली लोणावळ्याच्या माजी नगराध्यक्षा सुरेखाताई जाधव यांच्या हस्ते , माजी उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि लोणावळा मंडलच्यावतीने मंडल अधिकारी बी.के.मेकाले यांनी या सेवा मेळाव्याचे आयोजन केले होते.

यावेळी मंडलअधिकारी कार्यालयाचे तलाठी श्री.जाधव, श्रीमती लोखंडे , श्रीमती रच्चेवार , तलाठी श्री.राणे , श्री.बढे व कोतवाल मधुकर गायकवाड , सौ.वाघमारे , श्री.पटेकर आदी उपस्थित होते.पुरवठा विभागाचे श्री.खोमणे व सहकारी उपस्थित होते.निवडणूक विभागाचे मिसाळ भाऊसाहेब व सर्व बीएल ओ. उपस्थित होते.नागरी सुविधा केँद्राचे शिवाजी जाधव , गणेश आहेर , सूर्यकांत आहेर, शंकर देशमुख तसेच आधारकार्ड नोँदणी करीता भांडवलकर , धनशेट्टी , देशमुख व तळेकर आदी उपस्थित होते.

१) नागरी सुविधा केंद्रातर्फे उत्पन्न दाखला , जात दाखले , रहिवाशी दाखला आसे -१२७ लाभार्थी .
पुरवठा विभागाच्या वतीने नवीन व दुबार शिधापञिका तसेच नावे कमी , जास्त नोंदवणे -७२ लाभार्थी
२) .निवडणूक विभागाचे वतीने नवीन मतदारनोंदणी , दुरूस्ती व मृतांची नावे कमी करणे , मतदार कार्ड व आधारकार्ड नोँदणी -१९८, तसेच
३) आधार विभागात नवीन आधारकार्ड दुरूस्ती -११५ लाभार्थी .
४) संजय गांधी विभागाचे वतीने संजय गांधी निराधार योजना , श्रावणबाळ योजना , इंदिरा गांधी लाभार्थी -०७,
५) कृषि सेवा विभागातर्फे कृषि विषयी सेवा -१० लाभार्थी ,
६) मंडल आधिकारी कार्यालयाकडून आहवाल , फेरफार , निर्गत , तक्रार केस निर्गत -४२ लाभार्थी ,
७) तलाठी कार्यालय तर्फे तलाठी उत्पन्न आहवाल , ७/१२ उतारे -२२५ लाभार्थी यांचेतर्फे लाभ घेण्यात आला.
यावेळी लोणावळा नगरपरिषद शाळेचे शिक्षक ,शिक्षीका , काही पोलिसपाटील उपस्थित होते..



