दोस्ती एक अफसाना है- भुल जाये तो सपना है! यादआये तो अपना है !
प्रत्येकाच्या आयुष्यातील प्रवासात नाती अनेक असतात पण मनाला सावली देणारी नाती क्वचितच असतात..
दोस्ती एक अफसाना है- भुल जाये तो सपना है! यादआये तो अपना है !
प्रत्येकाच्या आयुष्यातील प्रवासात नाती अनेक असतात पण मनाला सावली देणारी नाती क्वचितच असतात.
आवाज न्यूज : डॉ शाळीग्राम भंडारी, तळेगाव दाभाडे, ८ डिसेंबर.
.काही नाती झाडासारखी असतात सुरुवातीला त्यांची काळजी घ्यावी लागते, त्यांचं संगोपन कराव लागतं ,संवर्धन कराव लागतं आणि हो मित्रांनो एकदा का ती बहरली की ती आपल्याला आयुष्यभर सावली देत राहतात .मित्रांनो यातलं एक महत्वाचं नातं म्हणजे मैत्रीचं नातं . हे ज्यावेळी हृदयापासून जुळत, त्यावेळी दुर्दैवानं कधीतरी काही कारणान हे नातं काही काळासाठी जरी दुरावलं ,तरीही अधिक घट्ट सुद्धा होत जातं ,असा बहुतेकांचा अनुभव आहे. आपल्या प्रत्येकाच्या जीवनात या नात्याचं फार महत्व आहे कारण मानवी जीवन म्हटलं म्हणजे ,अनेक वादळ आली, वावटळ आली, एवढेच नव्हे तर संघर्ष आहेत ,संकट आहेत, त्या वेळी याच नात्यांची खरी परीक्षा होते कारण यां नात्याची अनेक रूप आहेत .काही त्यात फक्त परिचित ,काही औपचारिक आहेत, काही जवळची आहेत, काही बोलकी आहेत ,काही अबोल आहेत पण खरं सांगू का मित्रांनो ,खऱ्या अर्थाने ही नाती आपल्याला जगायला शिकवतात, आपल्या निराशेच्याच्या काळात हीच नाती जपणारी माणसं ऊर्जा भरतात,एक उभारी देतात म्हणूनच मैत्रीच्या या नात्याला ” सोन्याहून पिवळं” असंच म्हटलं कारण मैत्रीचं हे नातं असं नातं आहे की ते थेट या हृदयीचे त्या हृदयीच सामावून जात आणि म्हणूनच ते आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत आपली सोबत करतात.

मित्रांनो एक प्रसंग आठवला तो असा की एका मित्राने आपल्या मुलीचं लग्न काढलं. त्याच्या अंदाजाप्रमाणे पाच लाख लग्नाची खर्चाची त्याची अपेक्षा होती पण त्याच्या दुर्दैवाने त्या मुलीच्या लग्नाला त्याला सात लाख रुपये खर्च आला म्हणून तो दोन लाखाच्या तरतुदीसाठी आपल्या अनेक नातलगांकडे गेला .दुर्दैवाने त्याला सर्व आप्तस्वकीय ,परिचित अशा लोकांनी नकार दिला. तो शेवटचा उपाय म्हणून आपल्या निकटच्या मित्राकडे गेला .
मित्राने सर्व परिस्थिती ऐकल्यानंतर क्षणाचाही विलंब न लावता रात्रीच बँकेतून दुसऱ्या कामासाठी आणून ठेवलेले पैसे चटकन मित्राच्या हातात ठेवून दिलेत .
मित्र सद्गदित अंतःकरणाने त्याचे परत परत आभार मानीत आनंदाने पैसे अगदी नजीकच्या काळात परत करण्याच् वचन घेऊन तो निघून गेला .ही सर्व घटना फक्त पंधरा मिनिटात झाली .तो गेल्यानंतर त्याच्या पत्नीने आपल्या पतीचा उतरलेला उदास असा चेहरा पाहिल्यानंतर तिने सरळ आपल्या पतिराजांना विचारल की तो हे पैसे परत करणार नाही या विचाराने तुम्ही उदास झाला असेल तर मग त्याला पैसे देण्याऐवजी सरळ त्याला नकार दिला असता, त्यावेळी पती राजांनी आपल्या पत्नीला उत्तर दिलं की तू वेडी आहेस का ? कारण मी वेगळाच विचार करून उदास झालेलो आहे .प्रिये माझ्या मनात असा विचार आला की ,जर मी त्याचा अत्यंत जवळचा मित्र स्वतःला समजत असेल तर त्याने माझी मदत घेण्यासाठी त्याला माझ्या घरी यावे लागले ,त्या ऐवजी मी ती मदत त्याला स्वतः अगोदर का केली नाही ,हाच माझ्या मनातील विचार माझ्या उदासीनतेच कारण आहे म्हणून प्रिये मी आता दुःखी कष्टी आणि उदास दिसतो आहे .
मित्रांनो असा विचार करणारी माणसं ज्या भगवंतांच्या मैत्रीच्या बंधनात आहेत ते ते खरोखरच या पृथ्वीतलावरील भाग्यवान आहेत .कारण काहीवेळा आपण चिंताग्रस्त समुदाय असतो त्यावेळी मला तुम्ही थोडा असं सर्वांना विनंती करतो पण *जिवाभावाचा मित्र मात्र आपल्याला एकटे सोडायला कधीच तयार नसतो आणि त्याची सोबत आपल्याला खूप आधार देऊन जाते ,तो आपल्या चेहऱ्यावरील बदलणारे भाव आपल्या नजरेने टिपत असतो आणि त्याच वेळी आपला हात हातात घेऊन घट्ट धरून ठेवतो* म्हणूनच मित्रांनो , मैत्रीच्या या नात्याला आपण सोन्यासारख नव्हे तर रत्नजडित हिऱ्याच्या दागिन्या सारखं जपायचं आहे . लायन डॉक्टर भंडारी




