ताज्या घडामोडी
रघुनाथ शिंदे यांचे निधन .
(प्रतिनिधी) दि.२१ : तालुक्यातील होळ येथील रहिवासी रघुनाथ केरबा शिंदे यांचे गुरुवारी (दि.१८) रात्री ९ वाजता अल्पशा आजाराने निधन झाले. मृत्युसमयी त्यांचे वय ७३ वर्षे होते. घरी असताना अचानक छातीत वेदना झाल्याने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. अंत्यविधी शुक्रवारी (दि.१९) सकाळी ११ वाजता होळ येथील बौद्ध वस्तीजवळील स्मशानभूमीत करण्यात आला. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, दोन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. ते पत्रकार उत्तरेश्वर शिंदे यांचे वडील होत.




