आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्र

*दिल्लीतील राष्ट्रीय विज्ञान प्रदर्शनात ह .दे .प्रशालेच्या उपकरणाची पहिल्या साठ उत्कृष्ट उपकरणात निवड*

Spread the love

नवी दिल्ली :- (उपसंपादक रत्नाकर लोंढे याजकडून) सोलापुरातील हरिभाई देवकरण प्रशालेतील कु.रेवती धोंडाप्पा गुजरे या विद्यार्थीनींनी दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रीय इन्सपायर अवार्ड विज्ञान प्रदर्शनात मांडलेल्या *”कपडे वाळवण्याचे आधुनिक तंत्रज्ञान “* या विज्ञान उपकरणांची राष्ट्रीय स्तरावरील पहिल्या अतिउत्कृष्ट साठ नावीन्यपूर्ण उपकरणांच्या यादीत निवड झाली आहे.

पुढील वर्षी जपान येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय विज्ञान प्रदर्शनासाठी निवड होईल. केंद्रीय मंत्री डॉ.जितेंद्र सिंग यांच्या हस्ते रेवती गुजरे ला प्रमाणपत्र, ट्रॉफी देऊन गौरविण्यात आला.यावेळी राष्ट्रीय इन्सपायर अवार्ड विज्ञान प्रदर्शनाचे प्रमुख नमिता गुप्ता उपस्थित होत्या. महाराष्ट्रासह सोलापूरसाठी अभिमानाची गोष्ट आहे.

नवी दिल्ली येथील इंदिरा गांधी स्टेडियमवर दि.९ ते ११ ऑक्टोबर दरम्यान दहावे राष्ट्रीय इन्सपायर अवार्ड योजनेतंर्गत राष्ट्रीय विज्ञान प्रदर्शन पार पडले. प्रशालेतील कु. रेवती गुजरे या विद्यार्थीनीने कपडे वाळवण्याचे आधुनिक तंत्रज्ञान मशीन हे विज्ञान उपकरण राष्ट्रीय स्पर्धेसाठी मांडलेले होते. देशभरातून ५४५ तर महाराष्ट्रातून २८ विद्यार्थी सहभागी झाले होते.
कपडे वाळवण्याचे आधुनिक तंत्रज्ञान या उपकरणाचा उपयोग ज्या घरांमध्ये कपडे वाळवण्यासाठी जागा नसते अशा घरांमध्ये होणार असून अतिशय कमी खर्चात हे उपक्रम तयार करता येते तसेच पावसाळ्यामध्ये जर पाऊस आला तर या उपकरणावर टाकलेली कपडे भिजणार नाहीत याची दक्षता घेतलेली आहे.


प्रशालेचे विज्ञान शिक्षक  गौतम कांबळे व  शहाणे सर यांचे मार्गदर्शन लाभले. यशाबद्दल संस्थेचे शाला समिती अध्यक्ष  राजेश पटवर्धन, प्रशालेचे मुख्याध्यापक  प्रकाश कांबळे, पर्यवेक्षिका स्मिता क्षीरसागर,  फाटक मॅडम, पर्यवेक्षक  हनुमंत मोतीबने,  औदुंबर सर्वगोड,  लकेश कमळे, प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारीवृंदानी अभिनंदन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!