ताज्या घडामोडी
लाच घेतलेली रक्कम 16 जणांत वाटली जाते ; पिंगळे यांच्या कबुलीनाम्याने सदस्य हादरले
पिंपरी : महानगरपालिकेत स्थायी समितीच्या सभापतींसह चार जणांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे.लाच म्हणून घेण्यात येणारी टेंडरच्या तीन टक्के रक्कम ही 16 जणांत वाटली जात असल्याची धक्कादायक कबुली सभापतींचे स्वीय सचिव ज्ञानेश्वर पिंगळे यांनी दिली आहे. यामुळे महानगरपालिकेतील सदस्य हादरले आहेत.
एसीबीच्या वतीने काल पुणे येथील विशेष न्यायालयात ज्ञानेश्वर पिंगळे यांनी तपासात कबूलनामा दिल्याचे सांगण्यात आले. आरोप करण्यात आलेले 16 जण सर्वपक्षीय सदस्य असल्याचा एसीबीचा अंदाज आहे. यामुळे स्थायी समितीतील भाजपसह, राष्ट्रवादी आणि शिवसेना सदस्यांचे धाबे दणाणले आहेत.



