ताज्या घडामोडी
*लाईटचा लोखंडी पोल अंगावर पडल्याने नाव्होलीच्या शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू!* *बाबासाहेब बिक्कड (सावकार)यांच्या अपघाती निधनाने नाव्होली गावावर शोककळा ; गावात शिमोलंघन झालेच नाही*
केज, भरारी न्युज गरीब असो की श्रीमंत आणि ज्याला जन्म आहे त्याला मृत्यू हा अटळ आहे.हे निसर्गाने दिलेला नियम असुन तो सर्वांना पाळणे ही पाळणे आहे. फक्त मृत्यूची वेळ ठिकाण आणि कारण कोणाला माहीत नाही. काल देखील अशीच घटना नाव्होली गावात घडली असुन ठणठणीत प्रकृती असलेले आणि चालत बोलत या गावातील सर्वोपरीचीत शेतकरी बाबासाहेब बिक्कड (सावकार) यांच्या अंगावर लाईटचा लोखंडी पोल पडून त्यांचा उपचारा दरम्यान दुर्दैवी अपघाती मृत्यू झाल्याने गावावर शोककळा पसरली असुन त्यांच्या निधनाने नाव्होली गावात आणि परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या बाबत सविस्तर माहिती अशी की केज तालुक्यातील नाव्होली येथील व्यवसायाने शेतकरी असणारे बाबासाहेब दादाराव बिक्कड वय अंदाजे ५५ वर्ष हे दि. २ ऑक्टोबर २०२५ गुरुवार रोजी दसरा सणा दिवशी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास गावातुन नांदूर केज रस्त्याने आपल्या घरी येत होते. त्याच दिवशी सकाळपासूनच गावापासून ते बाबासाहेब दादाराव बिक्कड हे राहातं असलेल्या येडझनी वस्ती पर्यंत महावितरण कंपनीचे राजेगाव सबस्टेशन अंतर्गत गावठाण शिंगलफेज लाईटचे लोखंडी पोल रोखण्याचे काम गुत्तेदारामार्फत सुरू होते. सांयकाळी अंदाजे ५:०० वाजणेच्या सुमारास बाबासाहेब बिक्कड हे गावाकडून येडझनी वस्ती असलेल्या आपल्या घराकडे येत होते. मात्र वाटेतच पोल रोवत असलेले पाहून रोडवर त्यांनी आपल्या शेतातुन काढून आणलेल्या सोयाबीनच्या ढिगाऱ्याजवळ काही वेळ ऊभे राहिले.असताना त्या ठिकाणी रोवण्यासाठी आणलेला लोखंडी पोल रोडच्या या बाजूकडून दुसऱ्या बाजूकडे नेत असताना ट्रॅक्टरला लोखंडी साखळीने लटकलेल्या पोलची साखळी तुटली आणि वर लटकलेला लोखंडी पोल रस्त्याच्या कडेला आपल्या सोयाबीनच्या ढिगाऱ्याजवळ उभे असलेले बाबासाहेब दादाराव बिक्कड यांच्या डोक्यात पडला त्यात त्यांच्या डोक्याला पायाला गंभीर मार लागल्याने त्यांना अंबाजोगाई येथील स्वा.रा.ति.या ठिकाणी उपचारासाठी दाखल केले असता उपचार सुरू असताना त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. हि घटना सांयकाळी घडल्याने आणि त्यादिवशी दसरा सण असल्याने शिमोलंघनाच्या तयारीत असणारे सारे गाव मृत्यूची माहिती मिळताच स्तब्ध झाले. त्यामुळे गावात शिमोलंघन झालेच नाही. रात्रीची वेळ असल्याने त्यांचे शवविच्छेदन दुसऱ्या दिवशी सकाळी झाल्याने त्यांच्या पार्थिवावर दि.३ ऑक्टोबर शुक्रवार रोजी दुपारी १:०० वाजता त्यांच्या शेतात हाजारोच्या उपस्थित अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी गावातील सर्व ग्रामस्थ आप्तेष्ट, मित्रपरिवार, सामाजिक,राजकीय, धार्मिक क्षेत्रातील चाहते अंत्यविधी साठी उपस्थित होते. बाबासाहेब बिक्कड यांना सावकार या नावाने सर्वत्र ओळखले जात होते. त्यांचा चाहता वर्ग मोठा होता. तसेच त्यांना धार्मिक सांप्रदायिक कार्याची खुप आवड होती. या त्यांच्या जाण्याने नाव्होली गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात भाऊ, पत्नी चंद्रकला, दोन मुले बालाजी आणि प्रदिप तर मुलगी सुरेखा (विवाहित) जावाई,सुना, नातवंडे असा मोठा परिवार असुन त्यांचा रक्षा सावरण्याचा कार्यक्रम दि.४ ऑक्टोबर शणिवार रोजी सकाळी ७:३० वाजता ठेवण्यात आला आहे. ------चौकट------ *घटनेच्या अगोदर काय घडले* नाव्होली येथील सामाजिक कार्यकर्ते अशोक बिक्कड आणि दैनिक लोकनायकचे केज तालुका प्रतिनिधी पत्रकार महादेव काळे हे दोघे मित्र दि. २ ऑक्टोबर गुरुवार रोजी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास केजहुन आपल्या गावी नाव्होली या ठिकाणी आपापल्या दुचाकीवरुन येत असताना गावाजवळील खंडोबा मंदिराजवळ असणाऱ्या पोपट बिक्कड यांच्या घरासमोर सुभाष बिक्कड यांची म्हैस अचानक आडवी पळल्याने दोघांच्या गाड्यांना जोराची धडक बसल्याने या गाड्या खाली पडल्या याच वेळी बाबासाहेब बिक्कड गावाकडून घरी जात होते. ते त्या ठिकाणी थांबून विचारपूस करुन दहा मिनिटे बोलुन आपल्या घराकडे गेले मात्र वाटेतच पोल रोखण्याच्या कामाजवळ थांबल्याने त्यांच्यावर हा मृत्यू ओढवला. अपघातानंतर अवघ्या अर्ध्या तासात ही घटना घडल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.




