ताज्या घडामोडी

स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूल मध्ये “कौशल्य विकास कार्यशाळेचे” आयोजन.

रोटरी क्लब ऑफ तळेगाव एम.आय.डी.सी व श्री. डोळसनाथ महाराज शिक्षण प्रसारक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूल मध्ये आज दिनांक 20/08/2022 रोजी *'शाडूच्या मातीचे श्रीगणेशा'* ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली.

Spread the love
स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूल मध्ये “कौशल्य विकास कार्यशाळेचे” आयोजन.

आवाज न्यूज: तळेगाव दाभाडे   रोटरी क्लब ऑफ तळेगाव एम.आय.डी.सी व श्री. डोळसनाथ महाराज शिक्षण प्रसारक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूल मध्ये आज दिनांक 20/08/2022 रोजी *’शाडूच्या मातीचे श्रीगणेशा’* ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली.

कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख मान्यवर रो.विल्सेन सालेर रो. पांडुरंग पोटे ,अतिश थोरात आणि सर्व मान्यवर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व प्रतिमा पूजनाने करण्यात आली.याप्रसंगी श्री.डोळसनाथ महाराज शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव मा.श्री.मिलिंद शेलार रोटरी क्लब ऑफ तळेगाव एमआयडीसीचे अध्यक्ष रो. विल्सेन सालेर रो.सुनिल खोल्लम , रो.पांडुरंग पोटे(प्रकल्प प्रमुख)रो.योगेश शिंदे, रो.सचिन कोळवणकर, रो.अंतोष मालपोटे,रो.विलास टकले, शालेय मुख्याध्यापिका शमशाद शेख मॅडम,पर्यवेक्षिका. रेणू शर्मा मॅडम, सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व सर्व विद्यार्थी उपस्थित होते.
स्वनिर्मितीचा निखळ आनंद मिळावा व पर्यावरणाच्या संरक्षणाची भावना रुजावी यासाठी कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.

शालेय मुख्याध्यापिका शमशाद शेख मॕडम यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.त्यांनी आपल्या प्रास्ताविकात पर्यावरण संरक्षण ही काळाची गरज असून या प्रकल्पातून पर्यावरण रक्षण व स्वनिर्मिती असा दुहेरी आनंद विद्यार्थ्यांना मिळावा असे मत व्यक्त केले.

सदर कार्यक्रमात शिल्पकार .आतिष थोरात यांचा स्वागतपर सत्कार रो.विल्सेन सालेर यांनी केला. कला शिक्षक.विजय जाधव यांचा सत्कार रो.पांडुरंग पोटे यांनी केला.उपस्थित सर्व मान्यवरांचा स्वागतपर सत्कार मुख्याध्यापिका.शमशाद शेख मॅडम यांनी केला.

पर्यावरणाची गुणवत्ता वाढवणे, समस्या व संवर्धनाविषयी जाणीव निर्माण करणे, विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी पोषक वातावरणाची निर्मिती करणे हा कार्यशाळेचा हेतू .यामध्ये शाळेतील पाचशे वीस विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला आणि श्रीगणेशाच्या मनमोहक मूर्ती तयार केल्या.

आपले मनोगत व्यक्त करताना प्रमुख पाहुणे रो.विल्सेन सालेर यांनी ह्या विद्यार्थ्यांमध्येच कुशल शिल्पकार दडलेले असतात; त्यांच्या सुप्त प्रतिभांना चालना देणाऱ्या उभयता संस्थांच्या या कार्यशाळेच्या कल्पनेचे स्वागत केले व विद्यार्थ्यांना मनापासून काम केले की मुर्ती सुंदरता आपोआपच येते असे सांगितले.
कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन शालेय मुख्याध्यापिका मा.सौ. शमशाद शेख मॕडम ,पर्यवेक्षिका .रेणू शर्मा मॕडम यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन सौ.आयेशा सय्यद यांनी केले.

या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक श्री. डोळसनाथ महाराज शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष  संतोष खांडगे,शालेय समिती अध्यक्षा .रजनीगंधा खांडगे मॕडम,उपाध्यक्ष .दादासाहेब उ-र्हे ,सचिव मिलिंद शेलार सर,कार्याध्यक्ष .बाळासाहेब शिंदे यांनी करून सर्व विद्यार्थ्यांना पर्यावरण पूरक शाडूच्या मातीचे गणपती बनविण्यास प्रोत्साहन दिले.
*’पर्यावरण वाचविण्यासाठी पाऊल उचलू,जीवनाला अनुकूल बनवू’* असा संकल्प करत कार्यक्रम संपन्न झाला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!