ताज्या घडामोडी

पुणे शहरातून चार वर्षाच्या मुलाचे अपहरण

माहिती मिळाल्यास शेअर करा आमदार महेश लांडगे यांचे आवाहन

Spread the love

पुणे : बाणेर येथून चार वर्षीय बालकाचे अपहरण करण्यात आल्याची घटना मंगळवारी सकाळी हाय स्ट्रीटवर राम इंदू पार्क सोसायटी जवळील उद्याना  शेजारी घडली.

स्वर्णव सतीश चव्हाण असे या अपहृत बालकाचे नाव आहे. स्वर्णवचे वडील सतीश चव्हाण यांनी याबाबत फेसबुकवर एक पोस्ट केली आहे .भाजपचे आमदार महेश लांडगे यांनी या घटनेची दखल घेत एक पोस्टर प्रकाशित केले आहे. स्वर्णव चव्हाण याच्या संदर्भात माहिती मिळाल्यास ती शेअर करावी असे त्यांनी पोस्टरमध्ये म्हटले आहे.

आमदार लांडगे यांनी एक फोटो जारी केला असून त्यामध्ये अपहरण झालेल्या मुलाचा फोटो तसेच सीसीटीव्ही फुटेजमध्ये आढळणाऱ्या दुचाकीचे दोन फोटो शेअर करण्यात आले आहे.तसेच संबंधित व्यक्ती आणि मुलाबाबत काही माहिती मिळाल्यास संपर्क करण्याचे आवाहन यामध्ये करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!