ताज्या घडामोडी

औद्योगिक वसाहतीत बिबट्याचा प्रवेश ; मर्सिडीज बेंज कंपनीत बिबट्याचे दर्शन

कंपनीत शोध मोहिम सुरू

Spread the love

चाकण : खेड तालुक्यात, शेतात, माळरानात, रहिवासी भागात बिबट्या दिसायच्या व बिबट्याच्या हल्ल्याच्या घटना पहायला व ऐकायला मिळतात. परंतु आता मात्र बिबट्याने एमआयडीसी क्षेत्रात प्रवेश केल्याची घटना समोर आली असून एका कामगाराने मोबाईलच्या कॅमेऱ्यात टिपलेले द्रुश्य सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल  झाले आहे.

चाकण एमआयडीसीतील मर्सडीज बेंज कंपनीत बिबट्या  आढळून आला असून बिबट्याला जेरबंद करण्यासाठी शोध मोहीम सुरू आहे.

आज सकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास कंपनीत कामगारांना बिबट्याचे दर्शन घडले.त्यामुळे एकच खळबळ माजली. त्यानंतर कंपनीत येणारे  कामगार तसेच बसेस बाहेर थांबविण्यात आल्या आहेत. वन अधिकारी व पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून बिबट्याचा शोध घेण्याची मोहीम सुरू आहे.कंपनीत बिबट्या घुसल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरताच सकाळपासून बघ्यांनी कंपनीसमोर गर्दी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!