आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्र

*हरिभाई देवकरण प्रशालेमध्ये हिंदी दिन उत्साहात साजरा*

Spread the love

सोलापूर:-(उपसंपादक रत्नाकर लोंढे) शाळा समिती अध्यक्ष  राजेश पटवर्धन सर व ह.दे .प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयाचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य  प्रकाश कांबळे सर यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक 14 /9/ 2023 रोजी मुळे सभागृहामध्ये हिंदी दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमासाठी पाचवी ते सातवीचे सर्व विद्यार्थी होते .पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांनी हिंदी माध्यमातून अनेक भाषणे ,कविता, गोष्टी, कथा सांगितल्या.


प्रमुख पाहुण्यांचा सत्कार  मुख्याध्यापकांनी केला .प्रमुख पाहुण्यांनी आपल्या मनोगतातून हिंदी भाषेचे महत्व व हिंदी साहित्याविषयी माहिती सांगितली.  मुख्याध्यापकांनी आपल्या मनोगतातून हिंदी भाषा बोलणाऱ्यांचे प्रमाण जास्त आहे, तिचा बोली भाषेमध्ये तिसरा क्रमांक लागतो. भारतातल्या 170 महाविद्यालयामध्ये हिंदी भाषा शिकवली जाते .14 सप्टेंबर हा दिवस हिंदी दिवस म्हणून साजरा केला जातो असे सांगितले.

कार्यक्रमाचे प्रास्तविक श्री हनुमंत मोतीबने सर यांनी तर सूत्रसंचालन लक्ष्मी पाटोळे व मनस्वी डोके या विद्यार्थिनींनी केले. आभार प्रदर्शन श्री इरशेट्टी सर यांनी केले. कार्यक्रमाप्रसंगी सर्व पर्यवेक्षक, शिक्षक ,शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!