सिंहगड एक्सप्रेसचे पिंपरी-चिंचवडमध्ये जल्लोषात स्वागत
चिंचवड : जवळपास दीड वर्षे कोरोना महामारीमुळे बंद असणारी सिंहगड एक्सप्रेस आजपासून पुन्हा मुंबई- पुणे दरम्यान धावू लागली आहे. गाडी पुन्हा प्रवाश्यांच्या सेवेत रुजू झाल्याने पिंपरी-चिंचवड येथे प्रवाश्यानी गाडीचे जल्लोषात स्वागत केले.मागील जवळपास दीड वर्षांपासूनची प्रवाशांची प्रतीक्षा यामुळे संपली आहे.
मुंबई – पुणे प्रवासासाठी सिंहगड एक्सप्रेस प्रवाश्यांची पहिली पसंती असते. ही गाडी सुरू व्हावी अशी प्रवासी संघटनेची अनेक दिवसांपासून मागणी होती अशी माहिती पिंपरी-चिंचवड प्रवासी संघाचे अध्यक्ष इक्बाल मुलाणी यांनी दिली. मागणी पूर्ण झाल्याने प्रवाशी उत्साहात होते.त्यांनी गाडीचे जोरदार स्वागत केले. तसेच मोटरमन व गार्डचा देखील गुलाबपुष्प नारळ देऊन सत्कार केला. यावेळी गाडीचे पूजन करुन एकमेकांना पेढे भरवण्यात आले.



