ताज्या घडामोडी

शिवघाटेश्वर शिव मंदिर येथे महाशिवरात्री निमित्त भाविकांच्या दर्शनासाठी लागल्या रांगा..

Spread the love

अध्यात्मिक :  शिवघाटेश्वर शिव मंदिर येथे महाशिवरात्री निमित्त भाविकांच्या दर्शनासाठी लागल्या रांगा..

आवाज न्यूज : मावळ प्रतिनिधी, १८ फेब्रुवारी.

अंदर मावळ येथील टाटा धरणाच्या निसर्गरम्य परिसरात असणाऱ्या वडेश्वर शिंदेघाटेवाडी येथील,शिवघाटेश्वर शिव मंदिर येथे महाशिवरात्री निमित्त भाविकांनी दर्शनासाठी  रांगा लागल्या होत्या.

पहाटे ५ वा.  शिवघाटेश्वर शिव मंदिरात या वेळी दुग्ध आभिषेक, बेल, फल, फुल हार वाहुन काकांच्या हस्ते महापूजा करून आरती करण्यात आली. सकाळी १०ते ११ या वेळेत ह. भ. प दत्तामहाराज शिंदे यांच्या सुश्राव्य वाणीत प्रवचन सेवा प्रदान करण्यात आली.

मंदिर परिसरात, महाप्रसादाची व्यवस्था, ग्रामस्थांच्या माध्यमातून करण्यात आली आहे.
अल्पावधीतच  प्रसिद्धीत आलेल्या या मंदिरात अनेक भाविक दर्शनासाठी  येत आहेत. सदानंद महाजन पवार यांच्या सहकार्यातुन व खांडभोर परिवाराच्या  माध्यमातून या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला असून या परिवाराकडून देखरेख केली जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!