स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूल मध्ये जागतिक योगदिन उत्साहात साजरा.
स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूल मध्ये जागतिक योगदिन उत्साहात साजरा.
आवाज न्यूज:श्री.डोळसनाथ महाराज शिक्षण प्रसारक मंडळ संचलित स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूल मध्ये मंगळवार दि.21/06/2022 रोजी ‘आंतरराष्ट्रीय योगदिन’ साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून.गोपी शेट्टी तसेच शालेय मुख्याध्यापिका . शमशाद शेख मॅडम, पर्यवेक्षिका,रेणू शर्मा मॅडम, पूर्व प्राथमिक विभाग प्रमुख,.तेजस्विनी सरोदे, प्राथमिक विभाग प्रमुख,. धनश्री पाटील,सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यालयातील सर्व विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व प्रतिमा पूजनाने करण्यात आली. यानंतर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे,.गोपी शेट्टी यांचा सत्कार शालेय मुख्याध्यापििका.शमशाद शेख यांच्या हस्ते करण्यात आले.
इयत्ता 3री व 4थी तील विद्यार्थ्यांनी योगासनाचे प्रात्यक्षिक करून दाखवले.इ 9 वी तील हिमेश हरिणखेडे,8वी तील ,.वेदांत देशमुख ,.पूर्वा बवले या विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून योग दिनाचे महत्त्व सांगितले.
सदर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे, गोपी शेट्टी यांनी “योग ही प्राचीन काळापासून आलेली परंपरा तसेच आत्मा व परमात्मा यांचे एकत्रीकरण म्हणजे योग होय” अशी योगाची परिभाषा सांगून योगामुळे शरीर व मन निरोगी राहते ; योगसाधनेने होणारे फायदे विद्यार्थ्यांना सांगितले.याचबरोबर शालेय जीवनातील व्यायाम तसेच मैदानी खेळाचे महत्त्व विद्यार्थ्यांना सांगितले. तद्नंतर शालेय शिक्षिका सौ.सुजाता गुंजाळ यांनी विद्यार्थ्यांना योग साधणे बरोबरच ध्यान साधनेचे महत्त्व पटवून सांगितले.
विद्यार्थ्यांना सूर्यनमस्कार, त्रिकोणासन, प्राणायाम, वृक्षासन, ताडासन, भ्रामरी, वज्रासन, सर्वांगासन,भुजंगासन,मकरासन इ. आरोग्यदायी ,उंची वाढविण्यासाठी उपयोगी असे विविध आसनाचे प्रात्यक्षिक शेट्टी सरांनी करून दाखवले . विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे व आनंदाने योगासने केली .
योगदिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन शालेय मुख्याध्यापिका मा.सौ.शमशाद शेख मॕडम,पर्यवेक्षिका, रेणू शर्मा मॕडम ,सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शालेय शिक्षिका. सोनिका कांबळे मॅडम यांनी केले व आभार प्रदर्शन.प्रियांका पवार यांनी केले.
श्री.डोळसनाथ महाराज शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष मा.श्री. संतोष खांडगे, शालेय समिती अध्यक्षा मा.सौ.रजनीगंधा खांडगे मॅडम,संस्थेचे उपाध्यक्ष, दादासाहेब उ-र्हे, सचिव ,. मिलिंद शेलार सर, कार्याध्यक्ष,. बाळासाहेब शिंदे, यांनी विद्यार्थ्यांनी योगासने करून आपले शरीर आरोग्यदायी ठेवावे असा संदेश दिला.
‘ॐ भूर्भुवः स्वः’या गायत्री मंत्राने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.



