ताज्या घडामोडी

मावळ तालुक्याची कोरोना मुक्तीकडे वाटचाल

Spread the love

मावळ : गेल्या काही दिवसांपासून मावळ तालुक्यातील कोरोना बाधित रुग्ण संख्येत कमालीची घट झाली असून तालुका कोरोना मुक्तीच्या उंबरठ्यावर आहे.

काल दिनांक 14 मार्च रोजी प्राप्त कोरोना अहवालानुसार दिवसभरात एकही कोरोना रुग्णांची नोंद झाली नसून सध्या सक्रिय रुग्णसंख्या केवळ 8 आहे.तालुक्यात कोरोनाचा हॉटस्पॉट असलेल्या तळेगाव दाभाडे शहरात 3 लोणावळा शहरात 1 वडगाव नगरपंचायत हद्दीत 1 तर ग्रामीण भागात 3 अशा प्रकारे 8 सक्रिय रुग्ण तालुक्यात आहेत.त्यातील पाच रुग्ण रुग्णालयात दाखल असून तीन रुग्ण होम आयसोलेशन मध्ये आहेत.

आज पर्यंत तालुक्यात एकूण 32038 रुग्णांची नोंद झाली असून त्यातील 31505 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीरीत्या मात केली आहे. तर 525 रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तालुक्यातील रुग्ण बरे होण्याचा दर 98.34 असून सक्रिय रुग्णांची टक्केवारी 0.02 आहे. तर मृत्युदर 1. 64 आहे. मावळात सक्रिय रुग्णसंख्या एक अंकी झाली असल्याने तालुका लवकरच कोरोना मुक्त होईल अशी दिलासादायक परिस्थिती निर्माण झाली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia