आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्र
सिनेपार्श्वगायिका सुप्रिया रविंद्र सोरटे M.A.(Music) प्रथम श्रेणीत घवघवीत यश …….!

सोलापूर:- महाराष्ट्रातील प्रसिध्द सिनेपार्श्वगायिका सुप्रिया रवींद्र सोरटे हिने नुकत्याच पुण्यशलोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठा तर्फे झालेल्या परीक्षेत MA Music या परीक्षेत प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होऊन घवघवीत यश मिळवले आहे.
या निमित्ताने सुप्रिया सोरटे यांचे सर्वच स्तरातून स्वागत,अभिनंदन आणि कौतुकाचा वर्षाव केला जात आहे. सुप्रिया हिने यापूर्वी M A.(Political science), संगीत विशारद,या पदवीने सन्मानित असून तिच्या यशाचा आलेख असाच वाढत राहो अश्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. सुप्रिया ही संमोहन तज्ञ डॉ रविंद्र सो रटे आणि डॉक्टर अलका सोरटे यांची कन्या आहे.



