ताज्या घडामोडी

डोंगरावरील आगीमुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी जळीत पट्टे काढावेत – गणेश लालगुडे 

Spread the love

वडगाव : येथे वन व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, गणेश शिवराम लालगुडे यांनी वनपरिक्षेत्र अधिकारी, वडगाव मावळ यांच्याकडे डोंगरावरील आगीमुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी जळीत पट्टे काढण्याची मागणी अर्जाद्वारे केली आहे. आग लागल्यास डोंगरावरील संपूर्ण गवत पेटू नये यासाठी गवता मधील काही अंतरावरील गवताचा पट्टा काढला जातो.यास जळीत पट्टे काढणे असे म्हणतात. त्यामुळे डोंगरावरील सर्व गवत पेट घेत नाही.

मावळ तालुक्यातील डोंगरावरील गवत सुकले आहे. त्यामुळे काही पर्यटक, शिकारी वर्ग व इतरांकडून डोंगरावर आग लावण्याचे प्रकार घडतात. त्यामुळे जळीत पट्टे काढावेत.तसेच वृक्षतोड करणाऱ्यांवर कारवाई करावी व वनव्यवस्थापन समितीला मार्गदर्शन करावे असे अर्जात म्हटले आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia