आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्र

*तत्कालीन शिक्षणाधिकारी कुंडगीर यांच्या अवैध मालमत्ता जप्तीचे आदेश निघताच बनसोडे यांनी २०२१ चे अगोदर च्या संचिका चोरीला गेल्याचीच दिली फिर्याद*

Spread the love

नांदेड- (सखाराम कुलकर्णी)नांदेड माध्यमिक शिक्षण विभागाचे माजी शिक्षणाधिकारी बाळासाहेब कुंडगीर यांच्या अवैध अपसंपदा जप्तीचे आदेश निघताच याची सखोल चौकशी होईल या भीतीने तत्कालीन उपशिक्षणाधिकारी दिलीपकुमार बनसोडे यांनी घाबरून जाऊन जिल्हा परिषद शिक्षण विभागातील २०२१ च्या अगोदरचे माध्यमिक व प्राथमिक विभागाचे अभिलेखे ,संचिका चोरीला गेल्याची फिर्याद पोलीस ठाण्यात देऊन चमडी बचाव धोरण अवलंबले असे दिसते. राज्यात शिक्षण विभागात सर्वात जास्त भ्रष्ट कारभार, भ्रष्टाचार होत असल्याचे दिसत असून संस्थेने नियुक्ती केलेल्या बोगस शिक्षकांना नियमबाह्य मान्यता देऊन अशा शिक्षकांच्या वेतनाच्या माध्यमातून सरळ सरळ शासनाच्या पर्यायाने सर्वसामान्य जनतेच्या तिजोरीवर काही शिक्षणाधिकारी डाका टाकून संस्था अध्यक्षांची घर भरत आहेत असे दिसते. पडताळणीनंतर मे २०१२ पासून शासनाने शिक्षक भरतीवर बंधन आणले होते. पण या बंधनानंतरच खरी बोगस भरती व त्यास नियमबाह्य मान्यतेला सुरुवात झाली. यात महाराष्ट्रातील बऱ्याच जिल्ह्यासह नांदेड जिल्ह्यात फार मोठ्या प्रमाणावर बोगस,नियमबाह्य शिक्षक नियुक्ती होऊन त्यांना शिक्षण विभागाकडून मान्यता मिळालेली आहे. त्यावेळेस बाळासाहेब कुंडगीर शिक्षणाधिकारी माध्यमिक नांदेडला जानेवारी २०२१ पर्यंत होते. यांनी त्यांच्या कार्यकाळात खूप मोठ्या प्रमाणावर बोगस शिक्षक नियुक्ती ला मान्यता दिली होती .काही जागृत नागरिकांच्या आवाजामुळे कुंडगीर यांनी दिलेल्या मान्यता चव्हाट्यावर येऊन शासनाने याची चौकशी केली व चौकशीनंतर कुंडगीर यांनी या बोगस शिक्षकांच्या मान्यतेच्या माध्यमातून केलेली अवैध संपत्ती जप्त करण्याचे आदेश निघालेत. शिक्षण उपसंचालक लातूर यांनी दि. २२ जून २०२२ ला कुंडगीर यांची अवैध संपत्ती जप्त करण्याचे आदेश शिक्षणाधिकारी माध्यमिक नांदेड यांना दिले. पण या आदेशाची अंमलबजावणी अद्याप झाली नाही. व ही कार्यवाही झाली की नाही याची चौकशी शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी पण केली नाही. कुंडगीरच्या संपत्ती जप्तीचे आदेश निघाले की नांदेडच्या शिक्षण विभागात घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते. तत्कालीन उपशिक्षणाधिकारी दिलीपकुमार बनसोडे हे त्यावेळेस कुंडगीर यांचे विश्वासू अधिकारी होते. म्हणून सर्व फायलींचे कामकाज बनसोडेच पाहत होते. त्यामुळे बनसोडे हे कुंडगीर वर झालेल्या कारवाईला घाबरून जाऊन वजीराबाद पोलीस स्टेशन गाठले व दि. १६जुलै २०२२ व १८ जुलै २०२२ ला सन २०२१ च्या अगोदरचे सर्व अभिलेखे, संचिका माध्यमिक व प्राथमिक विभागाच्या चोरीला गेल्याची फिर्याद दि. १५ सप्टेंबर २०२२ला दिली. ना रहे बास ना रहे बासरी अशी युक्ती बनसोडे यांनी केली असे दिसते. व प्राथमिक विभागाच्या संचिका चोरीला गेल्याची व फिर्याद दिल्याची माहिती शिक्षणाधिकारी प्राथमिक जि. प. नांदेड यांना नाही. व बनसोडे यांनी पण याबाबत काही सांगितले नाही. माजी शिक्षणाधिकारी प्राथमिक सोनटक्के यांनी सन २०१४ ते १६ मध्ये त्यांचा नातेवाईक आनंद राजमाने यास नियमबाह्य नियुक्ती व मान्यता दिली होती. त्यांची बदली झाल्यावर त्याचे वेतन तत्कालीन शिक्षणाधिकारी प्राथमिक प्रशांत दिग्रसकर यांनी काढले. व आता याची चौकशी सुरू झाल्यावर याची फाईल सापडत नाही म्हणून शिक्षणाधिकारी प्राथमिक नांदेड यांनी सदरील शिक्षक राजमाने याचा प्रस्ताव गहाळ झाल्याची फिर्याद वजिराबाद पोलीस स्टेशनला दिली. बनसोडे यांनी चोरीची फिर्याद २०२२ मध्ये दिलेली आहे हे जर प्राथमिक विभागाला माहीत असले असते तर ही राजमाने ची फाईल गहाळ झाल्याची फिर्याद २८-०२-२०२४ ला देण्याची गरजच नव्हती. एकंदरीत माध्यमिक व प्राथमिक शिक्षण विभागातील भ्रष्ट कारभार कोण- कसा करत आहे हा चर्चेचा विषय झाला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!