पन्नास टक्के जागा जिंकून भाजपचा विजय,महाविकास आघाडीला मोठा धक्का !
हाती संख्याबळ नसताना देखील भाजपने विजय मिळवला. देवेंद्र फडणवीस यांची चाणक्य नीती पुन्हा एकदा दिसून आली
पन्नास टक्के जागा जिंकून भाजपचा विजय !महाविकास आघाडीला मोठा धक्का !
राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना व काँग्रेस यांच्याकडून प्रत्येकी दोन उमेदवार रिंगणात. तर भारतीय जनता पार्टी कडून पाच उमेदवार..
काँग्रेस पक्षाने लक्ष्मण जगताप व मुक्ता टिळक यांच्या मतदानावर आक्षेप घेतल्याने मतमोजणीला दोन तास उशीर.
राष्ट्रवादी काँग्रेस: राम राजे निंबाळकर, एकनाथ खडसे विजयी।
शिवसेना सचिन अहिर, आमश्या पाडवी, विजयी ।
बीजेपी: प्रवीण दरेकर, श्रीकांत भारतीय, उमा खापरे, राम शिंदे, प्रसाद लाड विजयी ।
काँग्रेसचे भाई जगताप विजयी ।
संपूर्ण राज्याचे लक्ष्य लागून राहिलेल्या विधानपरिषद निवडणुकीत महाविकास आघाडीतील काँग्रेसच्या चंद्रकांत हंडोरे यांचा भाजप उमेदवार प्रसाद लाड यांनी पराभव केला. हाती संख्याबळ नसताना देखील भाजपने विजय मिळवला. देवेंद्र फडणवीस यांची चाणक्य नीती पुन्हा एकदा दिसून आली.
कॉंग्रेसचे चंद्रकांत हंडोरे आणि भाजपचे प्रसाद लाड यांच्यात खरी काटे की टक्कर होती. अखेर यात प्रसाद लाड यांनी बाजी मारत चंद्रकांत हंडोरे यांचा पराभव केला. प्रसाद लाड यांना 26 मते मिळाली. महाविकास आघाडीला हा मोठा धक्का मानला जात आहे.



