आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्र

गुण कमी मिळाल्याने विद्यार्थ्यांनी स्वतःला कमी लेखू नये – तुषार ठोंबरे

Spread the love

सोलापूर – ज्या विद्यार्थ्यांना इयत्ता दहावी बारावी परिक्षेत कमी गुण मिळत असतात त्या विद्यार्थ्यांना पालकांच्या जास्त सपोर्टची गरज असते. गुण कमी मिळाल्याने विद्यार्थ्यांनी स्वतःला कमी लेखू नये असे प्रतिपादन प्रमूख पाहुणे . तुषार ठोंबरे (अप्पर जिल्हाधिकारी, सोलापूर)यांनी केले. सम्राट अशोक स्टडी सेंटरच्या इयत्ता दहावी बारावी उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थी गुणगौरव समारंभात ते बोलत होते.

यावेळी मंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष -डॉ. रवींद्र चिंचोलकर (विभाग प्रमुख – पत्रकारिता व जनसंज्ञापन, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर), अण्णासाहेब वाघमारे (जिल्हाध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा), ऍड. गौतम जगझाप (मुख्य समन्वयक – सम्राट अशोक स्टडी सेंटर), शांतीकुमार कांबळे (माजी प्रशासन अधिकारी- आकाशवाणी, मुंबई) यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. रवींद्र चिंचोलकर म्हणाले की, विद्यार्थ्यांनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना प्रेरणास्थान मानावे. त्याचवेळी आपल्या परिसरातील वेगवेगळ्या क्षेत्रातील यशस्वी व्यक्तींचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपल्या जीवनाची वाटचाल करावी.

यावेळी प्रथम तथागत भगवान बुद्ध, प्रियदर्शी सम्राट अशोक, महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची मान्यवरांच्या हस्ते पुष्प, दीप, पूजा करण्यात आली. यानंतर कु. महामाया ढावरे यांनी रमाई हे एकपात्री नाटक, देविदास लंकेश्वर व सुमेध डोलारे यांनी भीमगीत सादर केले.

यावेळी इयत्ता दहावीतील गुणवंत विद्यार्थी रोहिणी वाघमारे, दिनेश सातपुते, प्रतिज्ञा तुर्भे, प्रियांका वडावराव पारस फटके अलोक मस्के तसेच इयत्ता बारावीतील सौ. रचना उपळेकर, समीक्षा थोरात, संतोष गायकवाड, प्रतिक वडावराव, सई गायकवाड, सदिच्छा डावरे, सम्राट प्रक्षाळे, यांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते भगवान बुद्ध व त्यांचा धम्म हा ग्रंथ व शैक्षणिक साहित्य देऊन सन्मान करण्यात आला.

गुण कमी मिळाल्याने विद्यार्थ्यांनी स्वतःला कमी लेखू नये – तुषार ठोंबरे

या कार्यक्रमास नानासाहेब कदम, नागसेन माने, अनिल जगझाप, रतन बनसोडे, केरबा जाधव, रत्नदीप कांबळे, चंद्रकांत कोळेकर, श्याम शिंगे, दीपक वाघमारे, राहुल वाळके, सुनिल शिवशरण, अनिरुद्ध वाघमारे, किर्तीकुमार शिवशरण, सुधाकर गायकवाड, ज्ञानेश्वर बनसोडे, विशाल गायकवाड, प्रल्हाद रोकडे प्रा. झुंबरे, प्रा. प्रकाश कांबळे, सहदेव सोनवणे, मधुकर उपळेकर, चित्तरंजन सातपुते, नागेश सातपुते, रवि कदम, शितल कांबळे, राखी सातपुते, छाया जगझाप, अंजली गायकवाड, पुष्पा भोसले सांची बनसोडे, रत्नविद्या जगझाप रंजना दिलपाक, ऋतुजा जगझाप, सुनंदा उपळेकर यांची उपस्थिती होती.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सम्राट अशोक स्टडी सेंटरचे यशवंत कांबळे, युवराज क्षीरसागर , बसवंत कदम, सुमेध डोलारे, बाळासाहेब शिंदे अंबादास कोणे, नितीन कांबळे अभिजीत कांबळे, चेतन दिलपाक, राहुल जगझाप, विवेक भडकवाड, विशाल टोणपे यांनी परिश्रम घेतले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अॅड. गौतम जगझाप, सूत्रसंचालन प्रा. सचिन गायकवाड तर आभार प्रदर्शन यशवंत कांबळे यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!