ताज्या घडामोडी

वरसोली टोलनाक्यावर फास्टॅग आॕनलाईन न भरणा करणाऱ्यांवर दुप्पट रकमेची वसुली.

वाहनचालक व बुकींग क्लार्क यांची वादावादी , गाडी अडवणे असा मनस्ताप ,सरकार देईल का लक्ष ? ? 

Spread the love

वरसोली टोलनाक्यावर फास्टॕग आॕनलाईन न भरणा करणाऱ्यांवर दुप्पट रकमेची वसुली.वाहनचालक व बुकींग क्लार्क यांची वादावादी , गाडी अडवणे असा मनस्ताप,सरकार  देईल का  लक्ष ? ? 

आवाज न्यूज लोणावळा प्रतिनिधी, २२ फेब्रुवारी.

वरसोली टोलनाक्यावर फासटॕग आॕनलाईन न भरणा करणाऱ्यांवर दुप्पट रकमेची वसुली.

वाहनचालक व बुकींग क्लार्क यांची वादावादी , गाडी अडवणे असा मनस्ताप ,सरकार  देईल का लक्ष ? ? असा प्रश्न काही दुप्पट दराने टोलवसुलीला सामोरे जावे लागलेल्या वाहनचालकाने सांगितले.

ता.२० रोजी राञी दहा ते सव्वादहाचे सुमारास वरसोली टोलनाक्यावर आलेली ओमनी कार वाहनचालक मारूती गारगोटे ,( रा-पाईट गाव सध्या मुंबई ,नाव व गाव बदलले आहे .फास्टॕग नसल्यास रोख रक्कम ४१ भरण्यासाठी त्यांनी पैसे देवू केले.पण टोलवर पावती न करता ८२/- रूपये मागण्यात आले.सदर वाहनचालकाने पुण्याकडे जातानाही शेडु़ग टोलनाक्यावर डबल चार्ज टोल भरला होता..
वरसोली टोलनाक्यावर सदर वाहनचालक टोल दुप्पट देत नसल्यामुळे तातडीने वरिष्ट तेथे आले..गाडी हलूच देणार नाही , असे ठरवूनच ! ! बाकी वाहनचालकांमधील मार्गावरून लेनमधून जायला सांगितले.

वाहनचालकांबरोबर कारमधे चाकणला तीन प्रवासी दाटीवाटीत बसलेले होते.तेही वैतागून गेले.
वाहनचालक थेट टोलनाका कार्यालयात जावून लेखी तक्रार देवून आणि फोटो काढून आला.टोलनाक्यावर पावती ८२/-रूपयांची घेऊन फोटो काढून लोणावळ्याकडे व पुढे मुंबईला गेला.ज्या वाहनचालक यांनी फास्टॕग नाही , अशा वाहनचालकांना रोख टोल भरताना वेगळी लेन आहे.बाकी फास्टॕग असलेल्या  तीन लेन आहेत..पण रोख भरणारे आहेत , त्यांना दुपटीने टोल न लावता घेतला पाहिजे , असे श्री.गारगोटे यांची मागणी आहे..ही चक्क लूट आहे , असे त्यांनी बोलून दाखवले.

याबाबत वरसोली टोलनाका येथे माहिती घेतली आसता , असा नियमच फास्टॕग शंभर टक्के वाहनांच्या साठी लागू करण्यासाठी रोखीने टोल भरल्यास तो दुप्पट वसूल केला जावा ,अशा आशयाचे येथील सह व्यवस्थापकांनी आवाज न्युज प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.

या वेळी त्यांनी ता.१३ फेब्रुवारी २०२१ चा सरकारचा आदेश असलेली व ता.१४ रोजी प्रसिध्दी माध्यमांशी याबाबत प्रसिध्दीस देण्यात आलेल्या जी आर मधे फास्टॕग शंभर टक्के वाहनचालकाने भरावा , त्यामुळे वाहनांच्या रांगा लागणार नाहीत , वेळ वाचेल , इंधन वाचेल असे सरकारने जीइरमधे म्हटलेले आहे..हा दुपटीचा टौल भरणा सध्या ९९% असलेला टोलवसुली आॕनलाईन फासटॕग मार्फत भरण्यासाठी शंभर टक्के व्हावा , यासाठी कायद्याने कडक आंमलबजावणी केली आहे , असा उल्लेख यात आहे.

या नियमामुळे शेकडो वाहनचालक यांना नाहक ञास होता असून सरकारने रोख रकमेची टोलवसुली दुप्पट रक्कम भरणा करून घेऊ नये , अशी असंख्य वाहनचालक यांनी मागणी केली आहे.

फास्टॕग नसताना दुप्पट रक्कम घेवून टोल नाक्यावर दिलेली पावती..!

टोलनाक्यावर फासटॕग नसल्यास दुप्पट आकाराने वसुली केली जाईल , आशी सूचना दिलेला फलक ..

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!