ताज्या घडामोडी

ग्रामपंचायत वाघोलीच्या सरपंचांवर अनियमित खर्चाचा आरोप

धारूर (प्रतिनिधी): वाघोली (ता. धारूर, जि. बीड) येथील ग्रामपंचायत सरपंच सौ. सोजरबाई अंबादास.गायकवाड यांनी १५ व्या वित्त आयोगातून प्राप्त झालेल्या निधीचा वापर नियमबाह्य पद्धतीने केल्याची तक्रार समोर आली आहे. याबाबत जिल्हा परिषद बीडच्या ग्रामपंचायत विभागाने नोटीस बजावली असून अनियमिततेबाबत स्पष्टीकरण मागविण्यात आले आहे. जिल्हा परिषदेकडून दिलेल्या माहितीनुसार वाघोली ग्रामपंचायतीस १५ वा वित्त आयोगातून एकूण 3 लाख 20 हजार रुपये प्राप्त झाले होते. या निधीतून विविध कामांसाठी खर्च करण्यात आला. मात्र, त्यात नियमबाह्य खरेदी आणि कार्यान्वयन झाले असल्याचे प्राथमिक तपासणीत निदर्शनास आले आहे. प्रत्यक्षात गावात कुठलीच विकास कामे झाली नाहीत असे चौकशी अंती स्पष्ट झाले आहे. एकूण ग्रामसेवक माचवे व सरपंच सोजरबाई गायकवाड यांनी सर्व मिळून जवळपास 9 लाख रूपये चा भ्रष्टाचार केल्याचे चौकशी समितीचे म्हणणे आहे झालेला खर्च असा : मिनी आंगणवाडी गॅस स्टोव्ह व आंगणवाडी साहित्य – १,०८,९१४ रुपये कार्यालय विकास कार्यक्रम अंतर्गत – ३४,००० रुपये शेतकरी प्रशिक्षण – २५,००० रुपये भूतपूर्व सैनिक प्रशिक्षण – ३८,००० रुपये शाळा विकास – ४५,५०० रुपये आंगणवाडी साहित्य – २७,८०० रुपये मुख्य आक्षेप ग्रामपंचायतीतून करण्यात आलेली ही खरेदी प्रत्यक्ष बाजारभावापेक्षा जास्त दराने झाल्याचा आरोप आहे. तसेच खरेदी करण्यात आलेल्या साहित्याचे साठा नोंदवहीत योग्य नोंद नसल्याचे आढळले आहे. याशिवाय, प्रशिक्षण कार्यक्रमांसाठी खर्च दाखवला असला तरी प्रत्यक्षात प्रशिक्षण झाले नसल्याचे समोर आले आहे. पुढील कारवाई या अनियमिततेबाबत जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाने नोटीस बजावून 7 दिवसांत स्पष्टीकरण देण्याचे आदेश सरपंचांना दिले आहेत. अन्यथा महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ अंतर्गत आवश्यक ती कारवाई करण्यात येईल, असा इशारा संबंधित अधिकाऱ्यांनी दिला आहे. वरील ग्रामपंचायत वाघोली ने केलेला खर्च हा बाजारभावापेक्षा जास्त भावाने केलेला असल्याने हा खर्च झालेला आहे या खर्चाची कारवाई आता नेमकं ग्रामपंचायतीच्या सरपंचावर होणार का खर्च केलेल्या कार्यकाळातील ग्रामविकास अधिकारी यांच्यावर होणार याकडे गावकऱ्यांचे लक्ष लागलं आहे.

Spread the love

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!