तळेगाव दाभाडे इनरव्हीलच्या वतिने, संगीत स्वरताज’ या गाण्याच्या स्पर्धेचे आयोजन..
अध्यक्षा वैशाली दाभाडे यांनी विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी अशा स्पर्धा वेळोवेळी आयोजित करण्याचा मानस व्यक्त केला.
आवाज न्यूजः तळेगाव दाभाडे , प्रतिनिधी
इनर व्हील क्लब डिस्ट्रिक्ट 313 च्या अध्यक्षा मुक्ती पानसे यांच्या संकल्पनेतून तळेगाव दाभाडे इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा वैशाली दाभाडे यांनी ‘संगीत स्वरताज’ या गाण्याच्या स्पर्धेचे आयोजन केले. विविध शाळेतील विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग घेतला.
या स्पर्धेत प्रथम क्रमांक सह्याद्री इंग्लिश स्कूलच्या ऋगवेद किरण आरंके, द्वितीय क्रमांक जैन इंग्लिश स्कूलच्या अद्वय प्रसाद मुंगी, तृतीय क्रमांक जैन इंग्लिश स्कूलच्या सानिका कमलेश मोडक हि पटकावला.डिस्ट्रिक्टला ऑनलाइन व्हिडिओ पाठवले असता, झोन 1 मधून ऋग्वेद किरण आरंके याचा द्वितीय क्रमांक आला. सहभागी विद्यार्थ्यांना सर्टिफिकेट व ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमासाठी संगीत शिक्षिका चांदणी पांडे यांनी सहकार्य केले. प्रास्ताविक करताना अध्यक्षा वैशाली दाभाडे यांनी विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी अशा स्पर्धा वेळोवेळी आयोजित करण्याचा मानस व्यक्त केला.
सूत्रसंचालन अनुप्रिया खाडे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संगीता जाधव, ममता मराठे, जयश्री दाभाडे, ज्योती जाधव, संगीता शेडे, वैशाली चव्हाण व सचिव निशा पवार यांनी नियोजन केले. आभार संध्या थोरात यांनी मानले. या वेळी विद्यार्थी, पालक, सर्व माजी अध्यक्षा, क्लब सदस्या व मोठया संख्येने नागरिक उपस्थित होते.



