ताज्या घडामोडी

चिखली येथील इंद्रायणी नदी मध्ये नाले टाकून दुषित सांडपाणी नदीमध्ये सोडले जाते. त्यामुळे ईंद्रायणी नदीचे पाणी प्रदूषण रोखावे. नितीन मस्के यांच्या तक्रारीला यश…

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण बोर्ड यांनी तक्रारीची दखल घेतली असून सदर तक्रारीवर लवकरात लवकर कारवाही करण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण कंट्रोल बोर्ड यांना सांगितले.

Spread the love

चिखली येथील इंद्रायणी नदी मध्ये नाले टाकून दुषित सांडपाणी नदीमध्ये सोडले जाते. त्यामुळे ईंद्रायणी नदीचे पाणी प्रदूषण रोखावे. नितीन मस्के यांच्या तक्रारीला यश…

आवाज न्यूज : लोणावळा प्रतिनिधी. ७ जानेवारी.

चिखली येथील इंद्रायणी नदी मध्ये नाले टाकून दुषित सांडपाणी नदीमध्ये सोडले जाते तसेच येथील कंपन्या कारखान्यातील सांडपाणी नदी मध्ये सोडले जाते त्यामुळे ईंद्रायणी नदीचे पाणी दूषित “होत आहे.

तसेच सदर नदी ही पुढे जाऊन आळंदी या ठिकाणी पोहचते त्यात लाखो भाविक सदर पाणी पिण्यास व अंघोळ  करण्यास वापरतात त्यामुळे सदर दुषित पाण्यामुळे आरोग्याचा धोका निर्माण झाला आहे. तरी योग्य ती कायदेशीर कारवाही करण्यात यावी व नदीचे प्रदूषण रोखावे. अशी तक्रार नितीन मस्के यांनी केंद्रीय प्रदूषण नियंत्रण बोर्ड यांना केली होती.

लाखो भाविकांसाठी केलेला छोटासा प्रयत्न. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण बोर्ड यांनी तक्रारीची दखल घेतली असून सदर तक्रारीवर लवकरात लवकर कार्यवाही करण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण कंट्रोल बोर्ड यांना सांगितले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!