ताज्या घडामोडी

सेवाधाम ट्रस्ट ग्रंथालय व मोफत वाचनालयाच्या अध्यक्षपदी सुरेश धोत्रे यांची निवड

Spread the love

तळेगाव दाभाडे: सेवाधाम ट्रस्ट ग्रंथालय व मोफत वाचनालयाच्या अध्यक्षपदी तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष सुरेश धोत्रे यांची निवड झाली. सेवाधाम ट्रस्टचे विश्वस्त डॉ कृष्णकांत वाढोकर यांच्या हस्ते नूतन कार्यकारिणीच्या आज (दि. २४) रोजी झालेल्या पहिल्या सभेत सत्कार करून पदभार सोपविण्यात आला.

सेवाधाम ट्रस्ट ग्रंथालय व मोफत वाचनालयाची स्थापना १९८१ साली झाली असून नगर परिषदेच्या नाना भालेराव कॉलनीतील आरक्षित भूखंडावर स्वमालकीची एक मजली इमारत, ३० हजार ग्रंथांचा साठा असलेले तालुक्यातील १४ ग्रंथालयांचे प्रतिनिधित्व करणारे, ‘अ’ वर्ग प्राप्त वाचनालयाच्या नूतन कार्यकारिणीची निवड १५ ऑगस्ट २०२१ ते १५ ऑगस्ट २०२३ या कालावधीसाठी करण्यात आली.

अध्यक्ष पदी सुरेश धोत्रे, कार्यवाहक/सचिव पदी डॉ वर्षा सत्यजित वाढोकर, खजिनदार पदी कैलास काळे यांची निवड करण्यात आली. कार्यकारिणी सदस्य म्हणून नगरसेवक निखिल भगत, डॉ मिलिंद निकम, राजेश बारणे, अमित बांदल, अतुल पवार, उर्मिला छाजेड, मिनल कुलकर्णी, पुजा डोळस तर सल्लागार पदी साप्ताहिक अंबरचे संपादक सुरेश साखवळकर, निवृत्त परिवहन अधिकारी हरिश्‍चंद्र गडसिंग, वृक्ष तज्ञ डॉ हेमंत बेडेकर, लेखक श्रीकृष्ण पुरंदरे, समाजसेविका जयश्री जोशी यांची निवड करण्यात आली.

कार्यकारणीच्या संपन्न झालेल्या पहिल्या सभेमध्ये ग्रंथालय संगणीकृत करून अद्यावत करणे, नागरिकांमध्ये वाचनाची आवड निर्माण करून सभासद संख्या वाढवणे, नव्याने तयार होत असलेल्या अभ्यासिकेचे काम लवकरात लवकर पूर्ण करून स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन वर्ग सुरू करण्यावर भर देणे ही मुख्य धोरणे डोळ्यासमोर ठेवून काम करण्याचा संकल्प नूतन अध्यक्ष संचालक मंडळाने केला.

सेवाधाम ट्रस्टचे कार्यकारी विश्वस्त कै डॉ एस व्ही गोरे यांना श्रद्धांजली अर्पण करून सुरू झालेल्या सभेत विश्वस्त डॉ कृष्णकांत वाढोकर यांनी नवीन कार्यकारिणी सदस्यांना पुष्प देऊन स्वागत केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रंथपाल बाळासाहेब घोजगे यांनी केले.आभार प्रदर्शन कैलास काळे यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!