ताज्या घडामोडी

तुळजाभवानी मंदिरामध्ये नवरात्र उत्सव जल्लोषात साजरा..

४७ वर्षाची परंपरा राखत ; आनंदमय वातावरणात  नवरात्रोत्सव साजरा..

Spread the love

तुळजाभवानी मंदिरामध्ये नवरात्र उत्सव जल्लोषात साजरा..

आवाज न्यूज: तळेगाव दाभाडे प्रतिनिधी 4 ऑक्टोबर:

तुळजाभवानी मंदिरात देवीची उत्कृष्ट अशी आरास करण्यात आली. तसेच नऊ दिवस वेगवेगळ्या रंगाची साडी नेसवण्यात आली, तसेच महिलांनी व आजूबाजूच्या मावळ परिसरातील लोकांनी रांगा लावून दर्शन घेण्यात आले.

नववी माळ निमित्त मंदिरामध्ये होम हवन करण्यात आले. नवरात्र उत्सव देवीच्या उत्सवानिमित्त आजूबाजूची दुकाने मोठ्या प्रमाणात थाटण्यात आली होती हार, वेणी वटीच्या सामनाच्या विक्रेत्यांनी जिजामाता चौक गजबजून  गेला होता मंदिरात ट्रस्टींनी नियोजनबद्ध असे नियोजन केले होते.

४७ वर्षाची परंपरा राखत ; आनंदमय वातावरणात  नवरात्रोत्सव साजरा करण्यात येत आहे .लोकांचे श्रद्धेचे स्थान म्हणून ओळखले जाणारे मावळातील तुळजाभवानी मंदिर देवस्थान मार्फत रोज सायंकाळी आठ वाजता, विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते आरतीचे नियोजन केले होते.

आरती झाल्यानंतर प्रसादाचे रोज नियमितपणे वाटप केले जात होते. जिजामाता मंदिर ट्रस्ट तुळजाभवानी मंदिर जिजामाता चौक तळेगाव दाभाडे यांनी सदरची माहिती दिली.

नवरात्र उत्सवामध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशनचे मोठ्या प्रमाणात सहकार्य लाभले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!