ताज्या घडामोडी

चैतन्य इंटरनॅशनल स्कूलमध्ये  स्वामी विवेकानंद जयंती व राष्ट्रीय युवा दिन उत्साहात साजरा

Spread the love

इंदोरी : चैतन्य  चॕरिटेबल फाउंडेशन संचलित चैतन्य  इंटरनॅशनल स्कूलमध्ये आज (दि.12 जानेवारी ) रोजी  स्वामी विवेकानंद  जन्मदिवस व  राष्ट्रीय युवा दिन साजरा  करण्यात आला . या ऑनलाइन कार्यक्रमाच्या वेळी शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य  उपस्थित होते.

या कार्यक्रमाची सुरुवात शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती हेमलता खेडकर यांच्या हस्ते स्वामी विवेकानंद  यांच्या प्रतिमेच्या पूजनाने करण्यात आली. कुमार सोहम जाधव याने स्वामी विवेकानंद यांच्या विचारांशी संबंधित  प्रेरणादायी सुविचार सादर केला. कुमारी वैष्णवी माळी हिने स्वामी विवेकानंद यांचा जीवन परिचय  सांगितला. कुमारी सायबा खान हिने स्वामी विवेकानंद उपदेश पर आधारित एक कथा प्रस्तुत केली. विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती हेमलता खेडकर मॅडम यांनी राष्ट्रीय युवा दिनाच्या व स्वामी विवेकानंद  यांच्या जन्मदिवसा बद्दल शुभेच्छा  दिल्या.

राष्ट्रीय स्तरावर आयोजित 75 वा  आजादीचा अमृत महोत्सव आणि राष्ट्रीय युवादिनाचे औचित्य साधून सदृढ सशक्त युवा पिढी घडविण्यासाठी योगा व व्यायामाचे महत्त्व लक्षात घेऊन सर्व विद्यार्थ्यांना सूर्यनमस्काराचे महत्त्व सांगून त्यांच्याकडून  सूर्यनमस्कार करून घेण्यात आले. सर्व विद्यार्थ्यांनी रोज  सूर्यनमस्कार करणार असा संकल्प ही केला.  यामध्ये विद्यार्थी, पालक वर्ग व शिक्षकांनीही उस्फुर्त सहभाग घेतला व  प्रतिसाद दिला. या कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन विद्यालयाच्या मुख्याध्यापिका, अध्यापक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia