आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्र

*पत्रकार सुरक्षा समिती महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षपदी कोकणातील किरण बाथम यांची नियुक्ती*

Spread the love

सोलापूर ( प्रतिनिधी ) पत्रकार सुरक्षा समिती वतीने राज्यातील पत्रकारांच्या विकासासाठी उत्कर्षांसाठी न्याय हक्कासाठी अनेक वर्षापासून वेगवेगळ्या स्वरूपाचे आंदोलन उपोषण निवेदन व राज्यसरकार कडे पत्रव्यवहार करत असून या माध्यमातून राज्यातील पत्रकारांचे प्रश्न देखील राज्य सरकार कढून सोडवले आहेत परंतु

*जेष्ठ पत्रकार समान पेन्शन योजना*
*राज्यातील सर्वच पत्रकारांची शासन दरबारात नोंदणी*
*यादीवर नसलेल्या सर्वच वृतपत्रानां पूर्वी प्रमाणे शासकीय जाहिराती*
*राज्यातील युट्युब व पोर्टल ला शासकीय मान्यता*
*प्रभावी पत्रकार संरक्षण कायदा*
*पत्रकारांसाठी विमा योजना आरोग्य योजना*
*अधिस्वीकृती पत्रिका मधील जाचक अटी रद्द करणे*
*पत्रकारांच्या वाहनानां टोल मधून सूट देणे*
*पत्रकारांच्या पाल्ल्यासाठी शिष्यवृत्ती देणे*
*खंडणी सारखे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या पत्रकारांच्या बाबतीत स्वतंत्र अधिकारी मार्फत चौकशी*
*पत्रकारांवर होणारे हल्ले धमकी मारहाण*
या सह राज्यातील पत्रकारांच्या प्रश्नावर पत्रकार सुरक्षा समिती प्रभावी पणे काम करत असून अनेक वेळा पत्रकारांच्या प्रश्नावर आक्रमक भूमिका बजावून पत्रकारांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला आहे

*किरण बाथम यांचा अल्प परिचय*

किरण बाथम हे गेली अनेक
वर्षांपासून विविध माध्यमाचे पत्रकार म्हणून काम पाहिले असून पत्रकारांच्या प्रश्नाची त्यांना चांगलीच जाणीव आहे
किरण बाथम यांनी रायगड जिल्ह्यातील मुरुड-जंजिरा मधून वेगवेगळ्या दैनिकांच्या माध्यमातून पत्रकारिता केली. दै.लोकसत्ता, दै.सामना,दै. मुंबई-सकाळ, पुण्यनगरी, नवाकाळ अशा राज्यस्तरीय तसेच दै. कृषिवल, दै.रायगड टाइम्स(रत्नागिरी), दै. सागर, दै. शिवतेज अशा असंख्य वृत्तपत्रात त्यांचे लेखन खुप वेळा गाजले आहे.मराठी मधील प्रतिष्टीत चित्रलेखा साप्ताहिकचे ते कोकण प्रतिनिधी होते.सहारा-समय टीव्ही चॅनलच्या माध्यमातून त्यांनी टीव्ही मीडिया मधून पत्रकारिता सुरु केली त्यानंतर आयबीएन, आजतक,इंडिया टीव्ही,जय महाराष्ट्र, साम टीव्ही अशा वृत्त वाहिनीचे रायगड जिल्हा प्रतिनिधी म्हणून त्यांची कारकीर्द गाजली आहे. रायगड जिल्हा मराठी पत्रकार संघाचा निर्भीड पत्रकार पुरस्कार, राज्यस्तरावरील अनेक पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी लोकपाल बील यात्रा दरम्यान त्यांना पिंपरी येथे दौऱ्या दरम्यान निमंत्रित करून निर्भीड पत्रकार म्हणून विशेष गौरव केला होता. मुंबई-गोवा चौपदरीकरण आंदोलनात रायगड प्रेस क्लब सरचिटणीस,कार्याध्यक्ष व अध्यक्ष म्हणुन त्यांनी जिल्ह्यातील पत्रकारांचे प्रभावी नेतृत्व केले आहे.जिल्ह्यातील पत्रकारांचे त्यांनी रायगड जिल्हा पत्रकार संघटना हे व्यासपीठ त्यांनी उभे केले.
पत्रकारांच्या अडचणीत ते नेहमीच धावून जातात युवा व धाडसी पत्रकार म्हणून त्यांनी कोकणात आगळी वेगळी ओळख निर्माण केली आहे त्यांची पत्रकार सुरक्षा समिती महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे त्यांच्या निवडीचे प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार प्रदेश सचिव डॉ आशिषकुमार सुना पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष रामभाऊ सरवदे कार्याध्यक्ष आप्पासाहेब करचे संघटक शंकर माने उपाध्यक्ष बळीराम पवार ठाणे पालघर समन्वयक अरुण ठोंबरे यवतमाळ जिल्हा अध्यक्ष राम राठोड परभणी जिल्हा अध्यक्ष नागेश नागठाणे जालना जिल्हा अध्यक्ष डॉ निर्मल एस पी सोलापूर जिल्हा अध्यक्ष दत्तात्रय पवार पुणे जिल्हा अध्यक्ष वाल्हेकर यांनी अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!