ताज्या घडामोडी

भारतरत्न लता मंगेशकर यांना लोणावळ्यात सर्वपक्षीय श्रद्धांजली

Spread the love

लोणावळा : जवळपास 70 दशके रसिक मनावर राज्य करणा-या गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना लोणावळा शहरातील सर्वपक्षीयांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात सामुदायिक श्रद्धांजली वाहिली.

देशातीलच नव्हे तर विदेशातील प्रेक्षकांनी या गानसरस्वतीवर भरभरून प्रेम केले. भारतरत्न लता मंगेशकर यांचे रविवारी सकाळी निधन झाले. त्यांच्या निधनानंतर जगभरातील मान्यवरांनी शोक व्यक्त केला. शिवाजी पार्क येथे शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांना आज लोणावळेकरांनी श्रद्धांजली अर्पण केली.

यावेळी शिवसेना माजी जिल्हाप्रमुख मच्छिंद्र खराडे, माजी नगराध्यक्ष सुरेखा जाधव, काँग्रेसचे प्रदेश सचिव निखिल कवीश्वर, लोणावळा शहर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब फाटक, युवा सेना तालुका अध्यक्ष श्याम सुतार,शिक्षण समिती माजी सभापती बिंद्रा गणात्रा, नगरसेवक देविदास कडू, संध्या खंडेलवाल, सुधिर शिर्के,भाजप महिला अध्यक्षा योगिता कोकरे, शिवदुर्ग मित्रचे आनंद गावडे, सुनील गायकवाड आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button
Don`t copy text!