तळेगाव दाभाडे येथील हिंद विजय पतसंस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त, ॲड. विश्वनाथराव दाभाडे स्मृती व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे.
व्याख्यानमाला नाना भालेराव कॉलनीतील सेवाधाम ग्रंथालय ट्रस्टच्या मैदानात होणार असून, या व्याख्यानमालेचे उद्घाटन माजी राज्यमंत्री संजय उर्फ बाळा भेगडे यांच्या हस्ते ९ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६.०० वाजता होणार आहे.
तळेगाव दाभाडे येथील हिंद विजय पतसंस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त व रोहित रवींद्रनाथ दाभाडे यांच्या सोळाव्या स्मृतिदिनानिमित्त येत्या 9 फेब्रुवारी ते 11 फेब्रुवारी दरम्यान कै. ॲड. विश्वनाथराव दाभाडे स्मृती व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे.
आवाज न्यूज : तळेगाव दाभाडे, वार्ताहर. ८ जानेवारी.

ही व्याख्यानमाला नाना भालेराव कॉलनीतील सेवाधाम ग्रंथालय ट्रस्टच्या मैदानात होणार असून, या व्याख्यानमालेचे उद्घाटन माजी राज्यमंत्री संजय उर्फ बाळा भेगडे यांच्या हस्ते ९ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६.०० वाजता होणार आहे.
मावळ तालुक्यात अग्रगण्य असलेल्या दोन पतसंस्थांना हिंदविजय सहकार पुरस्काराने, तर सहकार चळवळीमध्ये भरीव योगदान देणाऱ्या व्यक्तींना हिंदविजय सहकार भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे, अशी माहिती संस्थेचे संस्थापक ॲड. रवींद्रनाथ जयवंतराव दाभाडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.यावेळी संस्थेचे अध्यक्ष सुधाकर देशमुख, सचिव कैलास भेगडे आदी उपस्थित होते.

व्याख्यानमालेत ९ फेब्रुवारी रोजी सायंकाळी सहा वाजता प्रथम पुष्प संत साहित्याचे अभ्यासक ह.भ.प. प्रा. भावार्थ महाराज देखणे हे गुंफणार असून, ‘आनंदी जीवन’ या विषयावर ते बोलणार आहेत. या व्याख्यानाच्या अध्यक्षस्थानी गड किल्ले अभ्यासक लेखक ओंकार वर्तले, तर ज्येष्ठ साहित्यिक श्रीकृष्ण पुरंदरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.१० फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६.०० वाजता द्वितीय पुष्प इतिहास संशोधक प्रा. डॉ. प्रमोद बोराडे गुंफणार असून, ‘अपरिचित मावळ’ या विषयावर ते बोलणार आहेत. राजगुरुनगर सहकारी बँकेचे उपाध्यक्ष दत्ताभाऊ भेगडे अध्यक्षस्थानी, तर जयहिंद सहकारी बँकेचे वाकड शाखेचे उपाध्यक्ष गुलाबराव वाघोले प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

- ११ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजता तृतीय पुष्प द्वारका जालान गुंफणार असून, ते ‘चलती रहे जिंदगी’ या विषयावर व्याख्यान देणार आहेत. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते ॲड. शाबू मुऱ्हे हे अध्यक्षस्थानी, तर लायन्स क्लब तळेगाव दाभाडेचे माजी अध्यक्ष सुनील जैन प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.तसेच संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त 11 फेब्रुवारी रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५.३० या वेळेत सत्यनारायण महापूजा व पान सुपारी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम हिंद विजय पतसंस्थेचे मुख्य कार्यालय येथे होणार आहे.

संस्थेविषयी :मावळ तालुक्यात पतसंस्थेच्या ५ शाखा असून, संस्थेचे कार्यक्षेत्र पुणे जिल्हा आहे. संस्थेस ISO 9001 प्रमाणपत्र मिळाले असून, संस्थेकडे सुमारे ३७ कोटी रुपयांच्या ठेवी आहेत. मागील वर्षी संस्थेला ७६ लाख रुपये नफा झाला असून, संस्था सभासदांना १५ टक्के लाभांश सातत्याने देत आहे.



