ताज्या घडामोडी

परंदवडी मावळ, येथील भारत यात्रा ट्रस्टच्या केंद्रात चोरी..

भारत यात्रा केंद्र येथे कामगारांसाठी बांधलेल्या दहा खोल्यांची, आचार्य भवन, गांधी कुटी, एस. एम जोशी भवन, आंबेडकर भवन, गोशाळा यांचे नुकसान..

Spread the love

परंदवडी मावळ, येथील भारत यात्रा ट्रस्टच्या केंद्रात चोरी

आवाज न्यूजः हर्षल अल्पे, तळेगाव दाभाडे, प्रतिनिधी १३ ऑगष्ट.  परंदवडी येथील भारत यात्रा ट्रस्टच्या केंद्रातील सामानाची, खोल्यांची तोडफोड करत सामानाची चोरी करण्यात आली आहे. याप्रकरणी यशवंत हरी यादव (वय ३८ रा. बाणेर) यांनी शिरगाव परंदवडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भारत यात्रा ट्रस्टच्या केंद्रात अज्ञात चोरट्यांनी जुलै रोजी जंगम मालमत्तेचे नुकसान करण्याचा प्रकार उघडकीस आला होता.

याप्रकरणी भारत यात्रा केंद्र येथे कामगारांसाठी बांधलेल्या दहा खोल्यांची, आचार्य भवन, गांधी कुटी, एस. एम जोशी भवन, आंबेडकर भवन, गोशाळा यांचे नुकसान करण्यात आले आहे. ख बेड, भांडी चोरून नेले आहे. केंद्राचा लावलेली पाटी,  लोखंडी रॉड, अँगल, खिडकीचे गज, ही खाली तोडून टाकली आहे. मालमत्तेचे नुकसान व सात लाख रुपयांची चोरी चोरट्यांनी केली आहे. यावरून पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!