श्री डोळसनाथ नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार संपन्न.
सहकारातून समृद्धी"या उक्तीप्रमाणे तालुक्यात सहकार चळवळ गुण्यागोविंदाने एकत्रीत हसत खेळत चालते आहे व चालत राहील हे अधोरेखित करण्यासारखे आहे. नगरसेवक संतोष भेगडे.
श्री डोळसनाथ नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने सत्कार संपन्न.
आवाज न्यूज : तळेगाव दाभाडे, प्रतिनिधी ९ जानेवारी.

मावळ तालुक्यामध्ये सहकार क्षेत्रात अग्रगण्य असलेल्या आमदार कृष्णराव भेगडे नागरी सहकारी पतसंस्थेच्या तसेच पै.विश्वनाथराव भेगडे नागरी सहकारी पतसंस्थेच्या नूतन पदाधिकारी यांचा श्री डोळसनाथ नागरी सहकारी पतसंस्थांचे वतीने सत्कार करण्यात आला.

यावेळी संस्थेचे आधारस्तंभ, पुणे महानगर नियोजन समिती विद्यमान सदस्य तथा तळेगाव दाभाडे नगर परिषद चे नगरसेवक संतोषभाऊ भेगडे यांनी “सहकारातून समृद्धी”या उक्तीप्रमाणे तालुक्यात सहकार चळवळ गुण्यागोविंदाने एकत्रीत हसत खेळत चालते आहे व चालत राहील हे अधोरेखित करण्यासारखे आहे.

कारण देखील तसेच आहे त्यात आदरणीय आमदार कृष्णराव भेगडे साहे, पै.स्व विश्वनाथराव भेगडे, सहकार भूषण बबनराव भेगडे साहेब, माननीय राज्य मंत्री बाळाभाऊ भेगडे साहेब, आदरणीय बापूसाहेब भेगडे यांचे यात मोलाचे योगदान आहे असे म्हंटले . यावेळी संस्थचे अध्यक्ष राहुल पारगे, सल्लागार विलासभाऊ भेगडे यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले व नूतन पदाधिकारी यांना शुभेच्छा दिल्या.
तळेगाव दाभाडे शहरातील आमदार कृष्णराव भेगडे नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित चे पदाधिकारी अनुक्रमे
दिपक जयवंत जाधव – अध्यक्ष
राजेंद्र बबुशा घोजगे- उपाध्यक्ष
शाम माधवराव निकम- सचिव
गोपाळ दगडू परदेशी- खजिनदार
तसेच.
पै .विश्वनाथराव भेगडे नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित चे पदाधिकारी अनुक्रमे
शरद शंकरराव शेलार- अध्यक्ष
दिपक निवृत्ती भेगडे – उपाध्यक्ष
रणजित पिंगळे – खजिनदार
तसेच
शेलारवाडी,मावळ येथील अमरदेवी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित चे नूतन संचालक
विजय हरिद्वार भेगडे.
या सर्व माननीय मान्यवर महोदय यांचा श्री डोळसनाथ नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित चे वतीने मानचिन्ह,शाल,पुस्तक, व संस्थेची दिनदर्शिका देऊन सन्मानित करण्यात आले.

सत्काराला उत्तर देताना दिपक जाधव यांनी सांगितले की हा सन्मान माझा नसून सामान्य ग्राहकांचा आहे.
शरद शेलार म्हणाले की सर्व संस्थांनी एकच व्याजदर ठेवावा जेणे करुन आपसात चर्चा करुन हा मुद्दा मार्गी लावूयात.
शाम निकम यांनी या सत्कार आयोजन उपक्रम संकल्पना बद्दल संस्थापक बबनराव भेगडे , संतोषभाऊ भेगडे, तसेच विश्वस्त मंडळ यांचे आभार व्यक्त केले.
दिपक भेगडे,गोपाळ परदेशी यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी माजी अध्यक्ष शरदअण्णा भोंगाडे, उपाध्यक्ष निलेश राक्षे, सचिव अतुल राऊत, खजिनदार कौस्तुभ भेगडे, सल्लागार संजयभाई ओसवाल,संचालक दत्ताभाऊ भेगडे,राकेश खळदे,समिर भेगडे,प्रविण मुऱ्हे, अमित भसे, आदी मान्यवर पदाधिकारी, संस्थेचे कर्मचारी उपस्थित होते.
शरदअण्णा भोंगाडे यांनी सर्वांचे उपस्थिती बद्दल आभार मानले.



