आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्र

ह. दे. प्रशाला  मुख्याध्यापिका तथा प्राचार्या स्मिता क्षीरसागर  यांचा सेवा गौरव समारंभ संपन्न…..!

Spread the love

सोलापूर:- (उपसंपादक रत्नाकर लोंढे याज कडून) हरिभाई देवकरण प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय मुख्याध्यापिका तथा प्राचार्या स्मिता क्षीरसागर यांचा सेवा गौरव समारंभ कला निकेतन सभागृहात संपन्न झाला. मुख्याध्यापिका तथा प्रार्चाया स्मिता क्षीरसागर यांची 36 वर्षे सेवा पूर्ण झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पर्यवेक्षिका दीपा फाटक यांनी केले. मा. शाला समिती अध्यक्ष राजेश पटवर्धन यांच्या हस्ते सन्मान पत्र, शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला तसेच त्यांनी शुभेच्छा दिल्या. सन्मान पत्रा चे वाचन पर्यवेक्षक औदुंबर सर्वगोड यांनी केले. यावेळी पर्यवेक्षक हणमंत मोतीबने, तसेच प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी आपली मनोगते व्यक्त केली. मुख्याध्यापिका स्मिता क्षीरसागर यांनी आपल्या मनोगतातून लहान गटा पासून ते मुख्याध्यापिका पदा पर्यंत च्या आठवणींना उजाळा दिला. 1ऑगस्ट 1988 ते 31 जुलै 2024 पर्यंत कार्य केले. सर्वां कडून काही ना शिकायला मिळाले. सजीव व निर्जीव दोघां कडून शिकले. ह. दे. परिवाराचा उत्कर्ष असाच वाढत जावो अशा शुभेच्छा दिल्या. शेवटी मोठ्या दिमाखात विश्व विनायक या ढोल ताशाच्या गजरात निरोप देण्यात आला.

संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जयश्री बोळकवठेकर तर आभार सुशिलकुमार पाटील यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!