ताज्या घडामोडी

अलायन्स क्लब ऑफ पिंपरी चिंचवड तर्फे नेत्रदान जनजागृती कार्यक्रम साजरा

Spread the love

चिंचवड : नेत्रदान श्रेष्ठ दान या संकल्पनेतून दरवर्षी २५ ऑगस्ट ते ८ सप्टेंबर पर्यंत देशात नेत्रदान जनजागृती पंधरवडा साजरा करण्यात येतो. त्याचे औचित्य साधून अलायन्स क्लब ऑफ पिंपरी चिंचवड यांनी नेत्रदान जनजागृतीचा कार्यक्रम दि २९/०८/२०२१ रोजी सकाळी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले उद्यान, जगताप डेअरी या ठिकाणी घेण्यात आला. या वेळी उद्यानातील नागरीकांना नेत्रदान विषयी माहीती देण्यात आली. त्या वेळी क्लबच्या सभासदानी नेत्रदान जनजागृतीचे फलक घेऊन उद्यान व परिसरात फेरी मारली. यावेळी उद्यानातील नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला.

यावेळी अलायंस क्लब ऑफ पिंपरी चिंचवडचे अध्यक्ष रामेश्वर बोंगाळे, उपाध्यक्ष राजेश वाघुलदे, सचिव अण्णा मटाले, खजिनदार श्रीधर गळवे, पुर्व अध्यक्ष प्रकाश शहापरकर, निलेश नारखेडे, संचालक सुरेश कोटगिरे, राकेश हरपाळे तसेच रुद्रा ग्रुप रहाटणी यांचे सभासद उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia