ताज्या घडामोडी

सार्वजनिक गणेशोत्सव ; मुखदर्शन किंवा मंडपात दर्शनास बंदी

Spread the love

पुणे : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता पाहता तसेच गणेशोत्सवात होणारी गर्दी लक्षात घेऊन सरकारने यावर्षी मुखदर्शन किंवा मंडपात जाऊन दर्शन घेण्यावर बंदी घातली आहे.

मंडपातील गणरायाचे लाइव्ह प्रक्षेपण करता येणार आहे. तसेच ऑनलाईन अथवा इलेक्ट्रॉनिक माध्यमांद्वारे दर्शन करण्यात यावे असे गृह विभागाने म्हटले आहे. सरकारच्यावतीने यासाठी बुधवारी मार्गदर्शक सूचना गृह विभागाने जारी केल्या.

ह्या आहेत सरकारच्या सूचना-

1) मूर्ती शाडूची /पर्यावरणपूरक असल्यास विसर्जन शक्यतो घरच्याघरी करावे

2)आगमन व विसर्जन मिरवणुका काढण्यात येऊ नये. विसर्जनाच्या पारंपारिक पद्धतीत विसर्जन स्थळी होणारी आरती घरीच करून विसर्जन स्थळी कमीत कमी वेळ थांबावे.

3) लहान मुले आणि वरिष्ठ नागरिकांनी सुरक्षेच्या दृष्टीने विसर्जन स्थळी जाणे टाळावे संपूर्ण चाळीतील/ इमारतीमधील सर्व घरगुती गणेश मूर्तींची विसर्जनाची मिरवणूक एकत्रितरीत्या काढू नये.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia