ताज्या घडामोडी

ज्येष्ठ उद्योजक आणि पद्मभूषण राहुल बजाज यांचे निधन 

Spread the love

पुणे : ज्येष्ठ उद्योगपती आणि पद्मभूषण राहुल बजाज यांचे शनिवारी निधन झाले. ते 83 वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांना येथील रुबी हॉल क्लिनिक मध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. उपचारा दरम्यान आज दुपारी त्यांची प्राणज्योत मालवली.

राहुल बजाज यांचा जन्म कोलकत्ता येथे 10 जून 1938 रोजी झाला. बजाज ग्रुप उद्योग समूहाचे ते चेअरमन होते.तसेच काही काळ राज्यसभा खासदार ही होते. त्यांनी अर्थशास्त्र आणि लाॅ मध्ये पदवी संपादन केली होती.हाॅवर्ड विद्यापीठांमधून त्यांनी एमबीएचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर ते बजाज उद्योग समूहात कार्यरत होते.भारत सरकारने 2001 मध्ये त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले होते.

बजाज उद्योग समूहाने लाखो तरुणांना रोजगार उपलब्ध करून दिला. राहुल बजाज यांच्या नेतृत्वात उद्योग समूह भरभराटीला आला. त्यांच्या जाण्याने औद्योगिक क्षेत्राने एक दिशादर्शक गमावला आहे.देश परदेशातून व सर्व क्षेत्रांमधून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia