ताज्या घडामोडी

आंबळे ,निगडे, कल्हाट व पवळेवाडी गावातील भूसंपादन होणा-या जमिनीचा मोबदला मिळणार गावातच 

Spread the love

तळेगाव : येथील तळेगाव एमआयडीसी टप्पा क्रमांक चार मधील आंबळे, निगडे, कल्हाट व पवळेवाडी या गावातील जमिनी भूसंपादन प्रक्रिया पार पडल्यानंतर शेतकऱ्यांना गावातच जमिनीचा मोबदला मिळणार आहे अशी माहिती आमदार सुनील शेळके यांनी दिली.

गावातील इको सेन्सिटिव्ह झोनमुळे भूसंपादन प्रक्रिया रखडलेली आहे. इकोसेन्सिटिव्ह झोन काढण्याबाबत प्रस्ताव मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी केंद्र सरकारला पाठवला आहे. लवकरच याबाबत संमती आणणार असल्याचे आमदार शेळके म्हणाले.

ज्या शेतकऱ्यांना जमिनी द्यायच्या नाही त्यांना वगळण्यात येणार असून त्यांच्या जमिनी एमआयडीसी क्षेत्रात येत असतील तर त्या बदल्यात एमॴयडिसी क्षेत्राबाहेर जमीन देण्यात येणार आहे. तसेच गावाच्या सर्वांगीण विकासासाठी 25 एकर जागा प्रत्येक गावात शाळा, दवाखाना, क्रीडांगण आदी सोयी-सुविधांसाठी ठेवण्यात येणार असल्याचे आमदार शेळके यांनी सांगितले.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia