ताज्या घडामोडी

करंजगावमधील तरूण किशोर सुरेश तंबोरे खून प्रकरणी तपास लांबल्याने आर.पी.आय तर्फे ठिय्या आंदोलन

Spread the love

लोणावळा : करंजगावमधील तरूण किशोर सुरेश तंबोरे खूण प्रकरणी तपास लांबल्याने लोणावळ्याचे उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयाचे बाहेर ता.१८ रोजी आर.पी.आय तर्फे ठिय्या आंदोलन करण्यात आले.

यावेळी निवेदनाची प्रत उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्र पाटील यांचेकडे देण्यात आली. आर.पी.आय.(ए) चे राष्ट्रीय अध्यक्ष दिपकभाऊ निकाळजे यांचे मार्गदर्शनाखाली तालुका युवक अध्यक्ष चंद्रकांत ओव्हाळ, जिल्हा युवक अध्यक्ष अंकुश चव्हाण , तालुका कार्याध्यक्ष सुनिल सोनवणे, फिर्यादी पप्पू सुरेश तंबोरे ( मयताचा भाऊ ) तसेच सुतार समाजातील अरूण पवार तसेच विविध कार्यकर्त्यांनी या आंदोलनात भाग घेतला.

यावेळी ओव्हाळ , चव्हाण, तसेच पदाधिकारी विकास साळवे , पप्पू तंबोरे यांनी भाषणातून संतप्त भावना व्यक्त केल्या . या निवेदनातून ता.११ एप्रिल २०२१ रोजी किशोर सुरेश तंबोरे यांचा कामावरून घरी येताना अज्ञात इसमांनी धारदार शस्ञांनी खून केला.त्यातील मोकाट आरोपींना तत्काळ अटक करावे. तंबोरे कुटूंबातील सदस्यांना विनामोबदला पोलिस संरक्षण द्यावे , तसेच पोलिसांना संशयितांची नावे सांगूनही त्यांचेवर दबाव येत असेल,तर सदर प्रकरण सी.बी.आयकडे द्यावी , अशी मागणी यावेळी करण्यात आली.

राजेंद्र पाटील उपआधिक्षक यांनी सर्वांना अश्वासन दिल्यानंतर आंदोलनकर्त्यांनी ठिय्या आंदोलन समाप्त केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia