ताज्या घडामोडी

औंढे औंढोली ग्रूपग्रामपंचायतचे माजी सरपंच दुधाजी मांडेकर यांचे निधन..

औंढे औंढोली ग्रूपग्रामपंचायतचे माजी सरपंच पंढरीचे पायी वारकरी दुधाजी पांडुरंग मांडेकर (वय-९०)

Spread the love

|| निधन वार्ता  ||

औंढे औंढोली ग्रूपग्रामपंचायतचे माजी सरपंच दुधाजी मांडेकर यांचे निधन..

आवाज न्यूज लोणावळा ता.२८ (प्रतिनिधी ) मच्छिंद्र मांडेकर.  औंढे औंढोली ग्रूपग्रामपंचायतचे माजी सरपंच पंढरीचे पायी वारकरी दुधाजी पांडुरंग मांडेकर (वय-९०) यांचे सोमवारी ता २७ रोजी आल्पशः आजाराने निधन झाले. त्यांचे पश्चात चार विवाहीत मुलगे , तीन विवाहीत कन्या , सुना , नातवंडे , पतवंडे आसा परिवार आहे.
औढोलीतील सामाजिक कार्यकर्ते व कामगारनेते दत्ताञेय मांडेकर , विलास मांडेकर , कैलास मांडेकर व मधुकर माडेकर हे त्यांचे सुपुञ होत. औंढे -औंढोली चे ग्रामपंचायत सदस्य संदेश मधुकर मांडेकर हे त्यांचे नातू होत. कै.मांडेकर हे भांगरवाडी येथील नवमी भजनी मंडळाचे क्रियाशील सभासद म्हणून अनेक वर्षे कार्यरत होते.
कै. मांडेकर हे तेरा वर्षे औंढे औंढोली ग्रूपग्रामपंचायतचे बिनविरोध सरपंच म्हणून कार्यभार पहात होते.
औढे वि.का.स सोसायटी चे चेअरमन , तसेच देखरेख संघाचे चेअरमन म्हणूनही त्यांनी काम पाहिले.
त्यांनी चिंचवड येथील अडवाणी या कंपनीत तीस पस्तीस वर्षे नोकरी केली व राजकारणातही सरपंच झाले. सरपंच पदावर असताना जिल्हा परिषदेच्या शाळेची इमारत , गावचा पाझर तलावाचे श्रमदानातून बांधकाम केले. विहीरीचे नूतनीकरण आणि दुष्काळ परिस्थितीत विहीर खोदकाम करण्यात पुढाकार घेतला. कै.मांडेकर यांचेवरील आंत्यसंस्कार प्रसंगी कुसगाव चे माजी सदस्य व पंचायत समिती सदस्या राजश्री राऊतांचे पती संतोषभाऊ राऊत , माजी उपसरपंच नंदभाऊ विश्वासराव आणि सहकार महर्षी , पीडीसीसी बँकेचे संचालक माऊलीभाऊ दाभाडे यांचेकडून श्रध्दांजलीपर भाषण करण्यात आले. त्यांनी आपले एकनिष्ठ सहकारी आपण गमावला आसून कै.दुधाजीबुवा मांडेकर हे सदैव सुखदुःखात माझे पाठीशी राहिले. त्यांनी वारकऱ्यांचे बरोबर वारकरी झाले.पोथ्या वाचल्या , कीर्तन , भजन केले आणि राजकारणी लोकांशी गावाच्या विकासाबाबत प्रयत्नशील राहिले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia